दिलेले काम वेळेत पुर्ण करा: कृष्णाई कल्याण राठोड

शिवचरण वावळे
Monday, 10 June 2019
  • कृष्णाई कल्याण राठोड या विद्यार्थिनीने बायोलॉजी विषयात ३५० गुण घेऊन जिल्ह्यात ​सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला
  • गुरुवारी ‘सकाळ’च्या विभागीय कार्यालयास भेट दिली. त्या वेळी तिने अभ्यासातील सातत्य, छंद आणि आवडीनिवडी या विषयी मनमोकळेपणे संवाद साधताना यशाचे गुपित उघड केले. 

नांदेड: वैद्यकीय व दंतवैद्यक क्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या परीक्षेतकृष्णाई कल्याण राठोड या विद्यार्थिनीने बायोलॉजी विषयात ३५० गुण घेऊन जिल्ह्यात ​सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला. गुरुवारी ‘सकाळ’च्या विभागीय कार्यालयास भेट दिली. त्या वेळी तिने अभ्यासातील सातत्य, छंद आणि आवडीनिवडी या विषयी मनमोकळेपणे संवाद साधताना यशाचे गुपित उघड केले. 

या वेळी कृष्णाईने सांगितले की, ‘‘अभ्यासात सातत्य राखण्यासाठी महाविद्यालय आणि क्लासमध्ये रोज दिलेला अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करण्यावर जास्त भर होता. परीक्षा असेल त्या आठवड्यात वेळापत्रकानुसार नियोजनपूर्वक अभ्यास केल्याने परीक्षेच्या तोंडावर कधीही दडपण जाणवत नव्हते. मुलांनी अभ्यास करावा, असा घरच्यांचा सर्वांचा प्रेमाचा सल्ला असायचा. परंतु, त्यात आग्रह किंवा दडपण किंवा जबरदस्ती कधीच नव्हती. घरच्यांच्या पाठबळामुळेच रोज कितीही अभ्यास असला तरी, त्याचा ताण कधीच वाटत नव्हता. आलेला रोजचा दिवस आनंदी जात असल्याने बारा तास अभ्यास करण्याची माझ्यावर कधीच वेळ आली नाही. त्याऐवजी रोज चार तासच अभ्यास पण अगदी लक्षपूर्वक आणि मन लावून एकदम आनंदाने अभ्यास केला. माझ्या आनंददायी अभ्यास करण्याच्या कलेमुळेच मला हे यश प्राप्त झाले.’’ 

कृष्णाई राठोडच्या मते देशात डॉक्टरांची संख्या कमी नाही. परंतु, चांगल्या व कमीत कमी मोबदल्यात जास्तीत जास्त सेवा देऊन वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या डॉक्टरांची संख्या कमी आहे. म्हणून तिला एक उत्तम डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याची इच्छा आहे. यासाठी तिने मुंबईला जाऊन वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी ती पुढील तयारीस लागली आहे. कृष्णाई राठोड हिने केवळ ‘अभ्यास एके अभ्यास’ न करता त्यासोबत वेळ मिळेल तेव्हा नृत्य आणि संगीत ऐकण्याची आवड जपली असल्याचे तिने सांगितले. 

माझ्या क्लासमध्ये सुद्धा अनेकांना पैकीच्या पैकी मार्ग मिळायचे. परंतु, मुख्य परीक्षेच्या वेळी अशी हुशार मुले दडपणामुळे अभ्यासात मागे पडली. हा अनुभव असून, रोज केलेला अभ्यास कायम लक्षात रहावा, यासाठी नवीन फंडा म्हणून मी दृष्य स्वरूप आणि स्टोरी टाईप अभ्यास करण्यावरदेखील भर दिला होता. त्यामुळेच वर्षभर केलेला अभ्यास कायम लक्षात राहण्यास मदत मिळत गेली, असे तिने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News