'ही' कंपनी कॅम्पस मुलाखतीद्वारे भरणार १५ हजार जागा; जाणून घ्या! व्हर्च्युलर भरती प्रक्रीया 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 July 2020

दर्जेदार सेवा देण्यासाठी कॅम्पस मुलाखतीद्वारे १५ हजार नवीन तरुणांनी भरती केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदापासून व्हर्च्युलर भरती प्रक्रीया राबवली जाणार आहे असी माहिती एसटीसी एचआरने दिली. 

मुंबई : कोविड- १९ चा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात टाळेबंदी जाहीर केली. त्यामुळे बहुसंख्य उद्योग, व्यवसाय बंद पडले. लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. उद्योग, व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली. एकीकडे नोकऱ्या जात असताना दुसरीकडे एचटीसी कंपनीने हजारो नोकऱ्यांची भरती जाहीर केली. त्यामुळे १५ हजार पेक्षा अधिक तरुणांना आटी क्षेत्रात नोकरी मिळणार आहे. लॉकडाऊन काळात एचटीसीने चांगले काम केल्यामुळे सेवेची मागणी वाढली आहे. त्यामुळे कंपनीला अधिक काम मिळाले. दर्जेदार सेवा देण्यासाठी कॅम्पस मुलाखतीद्वारे १५ हजार नवीन तरुणांनी भरती केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदापासून व्हर्च्युलर भरती प्रक्रीया राबवली जाणार आहे असी माहिती एसटीसी एचआरने दिली. 

कशी होणार भरती प्रक्रीया

'कंपनीच्या विस्तारीकरणासाठी कर्माचाऱ्यांची आवश्यकता आहे तर वयोमानामुळे काही कर्मचाऱ्यांनी स्वखुशीने राजीनामा दिला. यामुळे अनेक जागा रिक्त झाल्या. या संपुर्ण जागेचा आढावा घेऊन जरजेनुसार जागा भरल्या जाणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन सुरु केले तेव्हापासून सर्व महाविद्यालये, विद्यापीठे बंद आहेत. त्यामुळे भरती प्रक्रीया हळूहळू सुरु आहेत. एप्रिल, मे, जून या तीन महिन्यात १ हजार नवीन तरुणांची भरती करण्यात आली आहे.  उर्वरीत १५ हजार जागांसाठी भरण्याची प्रक्रीया सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या व्हर्च्युलर मुलाखती घेऊन निवड केली जाईल' असे मत एसटीसीच्या एचआरने व्यक्त केले. लॉकडाऊन काळात कंपनीला मोठा फायदा झाला. त्यामुळे कंपनी आपला विस्तार करण्याच्या विचारात आहे. एसटीसीच्या चेअरमन पदावरुन शिव नाडर निवृत्त झाले. त्यांच्या जागी रोशनी नाडर मल्होत्रा विराजमान झाले आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News