खुशखबर..! "ही" कंपनी देशात देणार १० लाख नोकऱ्या 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 January 2020
  • कौशल्य विकास, कंटेंट निर्मिती, खरेदी-विक्री व्यवहार, उत्पादन यांसारख्या माध्यमातून २०२५ वर्षापर्यंत १० लाख रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : भारतातील ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी "अ‍ॅमेझॉन" व्यापारी क्षेत्रात पुढे आहेच, त्यासोबतच आता तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करण्यात देखील पुढाकार घेतला आहे. येत्या पाच वर्षांत अ‍ॅमेझॉन भारतात विविध क्षेत्रात तब्ब्ल १० लाख नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.

अ‍ॅमेझॉन ही गेल्या सहा वर्षांपासून भारतात ई-कॉमर्स बाजारपेठेत सक्रिय आहे. त्यानुसार आतापर्यंत सात लाख जणांना अ‍ॅमेझॉनने नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये आणखी पडली असून आगामी काळात १० लाखांची वाढ होणार आहे, असं कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 

Amazon Job

कंपनीने एक प्रसिद्धी पत्रक काढले आहे, त्यानुसार कौशल्य विकास, कंटेंट निर्मिती, खरेदी-विक्री व्यवहार, उत्पादन यांसारख्या माध्यमातून २०२५ वर्षापर्यंत १० लाख रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. अ‍ॅमेझॉन इन्कचे प्रमुख जेफ बेझोस यांनी भारतात सुमारे १ अब्ज डॉलर म्हणजेच ७ हजार कोटी गुंतविण्याचा घोषणा केली आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे भारतातील तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. त्यासोबतच भारताचा विकास दार वाढण्यास देखील मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News