'या' कंपनीने केला मनोरंजनाचा नवा प्लॅटफॉर्म 

यिनबझ ऑनलाईन टीम
Monday, 18 February 2019

सध्या मनोरंजनाचे विश्‍व विस्तारित  होत असून नवनवे प्लॅटफॉर्म उपलब्ध होतायेत. ‘शेमारू’ या कंपनीनेही चित्रपट रसिकांसाठी वेगळे पाऊल टाकले आहे.

शेमारूने आतापर्यंत चित्रपट रसिकांचे चांगलेच मनोरंजन केले आणि आता आणखीन मनोरंजन करण्यासाठी ‘शेमारूमी’ हा ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच केला आहे.

आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली या चित्रपटांसह भक्तिपर; तसेच बच्चे कंपनीसाठी विविध कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत.

याचे उद्‌घाटन नुकतेच टायगर श्रॉफने केले. तो म्हणतो, ‘लहान असताना शेमारूच्या डीव्हीडी आणून मी माझ्या आवडीचे चित्रपट पुनः पुन्हा पाहिलेले आहेत.

आता या नव्या प्लॅटफॉर्मवर मला आवडीचे कार्यक्रम पाहण्याची सोय झाली आहे. हे त्यांनी पुढचे पाऊल टाकले आहे.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News