पैसे कमवायची अक्कल आली म्हणून...

श्वेता बरकडे, सातारा 
Sunday, 30 June 2019

पैसे कमवायची अक्कल आली
म्हणून आई वडिलांना विसरून चालत नाही

पैसे कमवायची अक्कल आली
म्हणून आई वडिलांना विसरून चालत नाही
शेवटी पैसे कमवायची अक्कल सुद्धा 
आई वडिलांकडूनच आली.

घेतल घर, घेतली गाडी 
म्हणजे मोठी कामगिरी केलीत
पण त्याच फ्लॅटमध्ये आई वडिलांना राहून दिल नाहीत
तर त्यात कसली आली मोठी कामगिरी.

पण शेवटी हे विसरून चालणार नाही
शेवटी पैसे कमवायची अक्कल्सुद्धा
आई वडिलांकडूनच आली.

आयुष्यभर आईवडिलांनी 
आपलीच काळजी केली
आणि आज मात्र तीच लेकरे त्यांना विसरली
पैसे हातात आले म्हणून ती खूप मोठी झाली.

पण शेवटी हे विसरून चालणार नाही
पैसे कमवायची अक्कलसुद्धा 
आई वडिलांकडूनच आली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News