अनाथालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन विद्यार्थींनी वह्या भेट देऊन जपली सामाजिक बांधिलकी   

तुषार जाधव.
Thursday, 9 January 2020
  • आंतर महाविद्यालयीन  क्रीडा स्पर्धेत यश संपादन केल्यानंतर पारितोषिक म्हणून मिळालेल्या वह्या अनाथालयातील विद्यार्थ्यांना  भेट  देऊन सामाजिक बांधिलकी  जोपासण्यात आली. 

अंबरनाथ : आंतर महाविद्यालयीन  क्रीडा स्पर्धेत यश संपादन केल्यानंतर पारितोषिक म्हणून मिळालेल्या वह्या अनाथालयातील विद्यार्थ्यांना  भेट  देऊन सामाजिक बांधिलकी  जोपासण्यात आली. 
 
अंबरनाथच्या एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी  महाविद्यालयामध्ये  आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांत महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पाटगावकर, शाळेचे मुख्याद्यापक धनंजय जठार आदींच्या हस्ते प्रमाणपत्र, मेडल आणि वह्या भेट देण्यात आल्या. 
 
क्रीडा स्पर्धेत पारितोषिक म्हणून मिळालेल्या वह्या  महाविद्यालयाचे विद्यार्थी अनिकेत ठाकरे, आदित्य दाबणे, गौरव जमदरे, विशाल रसाळ, हसन शेख यांनी अंबरनाथमधील इला बाल सदन या अनाथालयातील विद्यार्थिनींना भेट देऊन  सामाजिक बांधिलकी जोपासली. संस्था अध्यक्ष डॉ. पाटगावकर, मुख्याद्यापक जठार तसेच  बाल  सदनच्या प्रियंका गुजर यांनी महाविद्यालयीन विध्यार्थ्यांच्या  स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
  

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News