यिन वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संकल्प

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 August 2020

यंदा कोरोनाच्या सावटामुळे हे सेलिब्रेशन होऊ शकले नाही. येवला तालुक्यात यिनच्या सदस्यांनी आपल्या घरी वृक्षारोपण करत यिनच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. 

नाशिक : सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचा सहावा वर्धापन दिन नुकताच पार पडला. दरवर्षी महाविद्यालयीन तरुणाईकडून विविध उपक्रमांनी धुमधडाक्यात वर्धापन दिनाचे सेलिब्रेशन होत असते, मात्र यंदा कोरोनाच्या सावटामुळे हे सेलिब्रेशन होऊ शकले नाही. येवला तालुक्यात यिनच्या सदस्यांनी आपल्या घरी वृक्षारोपण करत यिनच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. 

यावेळी यिनचे प्रतिनिधी सागर वाघ यांनी राजापूर येथे सदस्य अभिजित वाघ, युवराज वाघ, श्रावण चव्हाण, प्रतीक वाघ, नवनाथ गायकवाड यांच्यासमवेत वृक्षारोपण केले. यिनचे सदस्य कैलास गायकवाड, गौतम गायकवाड, शुभम गायकवाड यांनी रस्ते सुरेंगाव येथे वृक्षारोपण केले. यिनचे सदस्य वैभव सोनवणे यांनी विसापूर येथे आपल्या घरी वृक्षारोपण करून वर्धापन दिन साजरा केला.

सकाळ यिनच्या पुणे येथील कार्यालयातून यिनचे प्रमुख तेजस गुजराती यांनी आजी- माजी मंत्री व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नाशिक जिल्हा यिन पालकमंत्री जनार्दन धनगे, महामंडळ अध्यक्ष सागर घोडेराव, यिन प्रतिनिधी बापू गाडे आदी उपस्थित होते. यावेळी यिनचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक गणेश जगदाळे यांनी गेल्या सहा वर्षातील विविध आठवणींना उजाळा देत आगामी वाटचालीस सर्वाना शुभेच्छा दिल्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News