चला; आता विमानात पाहू शकता मॅच; तर फेसबुक, ट्विटरदेखील वापरू शकता

यिनबझ टीम
Friday, 21 February 2020

भारतातील एक एयरलाइन्स कंपनी आपल्या ग्राहकांसाठी फ्रि वायफाय सुविधा उपलब्ध करून देत आहे, कंपनीने सांगितल्याप्रमाणे पुढील महिन्यापासून ही सुविधा सुरू होईल.

सोशल मिडीया, क्रिकेट मॅच म्हणजे भारतातील अनेक तरुणांचा जीवाभावाचा विषय आहे. तो विषय अशा तरुणासांठी इतका गंभीर असतो की त्यासाठी ते आपली फ्लाईटदेखील सोडू शकतात. मात्र आता घाबरायची किंवा फ्लाईट मिस करायची काहीच गरज नाही. भारतातील एक एयरलाइन्स कंपनी आपल्या ग्राहकांसाठी फ्रि वायफाय सुविधा उपलब्ध करून देत आहे, कंपनीने सांगितल्याप्रमाणे पुढील महिन्यापासून ही सुविधा सुरू होईल.

हवाई प्रवास करतेवेळी वायफायची सुविधा पुरवणारी विस्तारा ही पहिली एयरलाइन्स कंपनी असेल. विस्तारा एयरलाइन्स, सिंगापुर एयरलाइन्स आणि टाटा ग्रुप यांच्यात हा करार झाला आहे. 2015 पासून या सुविधाचे नियोजन केले जात होते.

विस्तारा कंपनी आपल्या नव्याने लॉंच होत असलेल्या 'बोईंग 787 ड्रिमलाईनर' या विमानात ही सुविधा पुरवणार आहे. विस्ताराचे चीफ स्ट्रैटिजी ऑफिसर विनोद कानन यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की प्रवास करत असताना अनेक प्रवाशांना वॉट्स अॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टा  इतकच नाही तर लाईव्ह स्ट्रिमिंग, क्रिकेट मॅचसारखे लाईव्ह कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत. यासोबतच प्रवासादरम्यान ऑनलाईन गेमदेखील प्रवाशी खेळू शकतील.

विस्तारा एयरलाइन्स, सिंगापुर एयरलाइन्स आणि टाटा ग्रुप यांच्यात 2015पासून हा करार सुरू होता, त्या कराराला आता जिवंतरुप येताना दिसत आहे. या कराराच्या माध्यमातून 32 एअरबसेस A320s आणि बोईंग 737s विमानांची निर्मीती करण्यात आली असल्याची माहिती कानन यांनी दिली.

पैनासोनिक एवियॉनिक्स कॉर्प आणि नेल्को लिमिटेड यांच्याबरोबर भारतीय एअरस्पेस कंपनी सैटेलाइट कनेक्टिविटी सर्विस पुरवणार आहे, या सर्विसेसची पहिली ग्राहक विस्तारा कंपनी ठरल्याचेदेखील म्हटले जात आहे.

Come on; Now you can watch the plane match; You can also use Facebook and Twitter

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News