स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा-२०१९

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 December 2019

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदांच्या एकूण १८४७ जागा 

संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (CHSL) परीक्षा-२०१९
कनिष्ठ विभाग लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून किमान इय्यता बारावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – दिनांक १ जानेवारी २०२० रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्ष सवलत.)

पदांच्या एकूण १८४७ जागा 

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग/ माजी सैनिक/ महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी पूर्णपणे सवलत.)

परीक्षा – पूर्व परीक्षा १६ ते २७ मार्च २०२० दरम्यान आणि मुख्य परीक्षा २८ जून २०२० ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

online अर्ज करा - https://ssc.nic.in/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News