बाबासाहेबांनी सुरु केलेल्या महाविद्यालयांना मिळणार १३ कोटी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 29 July 2020

वाणिज्य व विधी महाविद्यालयाची दुरुस्ती, सिदार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचे बांधकाम, सोयी सुविधा आणि महाड येथे सुभेदार संवादकर वसतिगृह बांधण्यात येणार आहे.

मुंबई : 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयांना १२ कोटी ७९ लाख ७४ हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या निधीमधून वाणिज्य व विधी महाविद्यालयाची दुरुस्ती, सिदार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचे बांधकाम, सोयी सुविधा आणि महाड येथे सुभेदार संवादकर वसतिगृह बांधण्यात येणार आहे. पुढील दोन दिवसात याबाबद शासन निर्णय काढला जाईल' अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

धनंजय मुडे यांनी बुधवारी (ता.२९) मंत्रालयात एक बैठक आयोजित केली होती. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मुख्य सचिव, सहसचिव, समाज कल्याण आयुक्त आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते. अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेला पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयांचा प्रस्ताव यावेळी मजूर करण्यात आला. मुंबई येथील वाणिज्य व विधी महाविद्यालयाच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ९९ लाख ७१ हजार ८७२, सिदार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचे बांधकाम करण्यासाठी ४ कोटी, ९४ लाख ३६ हजार ७०० आणि अत्याधुनिक सोयी सुविधासाठी ४ कोटी, ४९ लाख २५ हजार, महाड येथील सुभेदार संवादकर वसतिगृह बांधकामासाठी १ कोटी ३६ लाख ४० हजार ६०३ रुपये ऐवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. काही दिवसात ही रक्कम उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे मुंडे यांनी सांगितले. 

अनेक वर्षांपासून ज्ञानदानाचे काम करणाऱ्या सिद्धार्थ महाविद्यालयाकडे सरकारचे दुर्लक्ष झाले होते. महाविद्यालयांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकत्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन समस्या सोडवण्याची विनंती केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गिरकर यांनी देखील समस्या सोडवण्याची मागाणी केली. त्यामुळे मुडे यांनी प्रस्तावाला मान्यता दिली.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News