या तारखेपर्यंत कॉलेज आणि क्लासेस बंद 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 30 July 2020

या तारखेपर्यंत कॉलेज आणि क्लासेस बंद

या तारखेपर्यंत कॉलेज आणि क्लासेस बंद 

कोरोनाच्या महामारीची समस्या गंभीर असल्याने महाराष्ट्रात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने अनलॉक ३ साठीच्या मार्गदर्शक सुचना राज्यांना पाठवल्या आहेत. नियमावलीनुसार देशातील कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद राहणार आहेत. हा निर्णय केंद्रशासनाने राज्यांना विचारात घेऊन घेतला आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहील.

गृहमंत्रालयाकडून ऑनलाइन शिक्षणाला प्रोत्साहीत केलं जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त मेट्रो, सिनेमागृह, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, बार, सभागृहे देखील बंदच राहणार आहेत. फक्त ५ ऑगस्ट नंतर जिमला आणि योगाभ्यास करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. 

अनलॉक ३ सुरू झाला असलातरी सुध्दा कंटेन्मेंट झोन मधील नियमावली शिथील अजिबात केली जाणार नाही. त्याचबरोबर सध्या सुरू असलेलं शिक्षण ऑनलाइन पध्दतीने सुरू राहिल. कोरोनाची परिस्थिती पाहून पुढचे निर्णय घेतले जातील. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंदचं राहतील. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News