महाविद्यालयीन फलक आता मराठीतच... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

ज्य शासनाने सर्व अकृषी विद्यापीठे, सर्व शासकीय, अशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित तसेच मॉडेल डिग्री महाविद्यालये, तंत्रशिक्षण संचालनालय व कला संचालनालयाच्या आधिपत्याखालील अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्था, पदवी, पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था यांमध्ये मराठी भाषेतून नामफलक लावण्याची सक्ती केली आहे. सर्व संचालक, महाविद्यालये, तंत्रनिकेतने, परिसंस्था यांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून, योग्य ती कार्यवाही करावी,

औरंगाबाद  : राज्यात महाविकास आघाडीचे स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारी व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढावा, यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी फाइलवर शेरा मराठीतच लिहिण्याच्या सूचना केल्या होत्या. आता शैक्षणिक संस्थांमध्ये सर्व नामफलक मराठी भाषेतूनच लावावेत, यासाठी १५ फेब्रुवारीला शासन निर्णय काढून संबंधित शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांना आदेश दिले आहेत. त्यानुसार आता सर्व महाविद्यालयांना मराठी भाषेतून फलक लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या संचालकांनी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १५ फेब्रुवारीला काढलेल्या शासन परिपत्रकाच्या आधारे शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांना हे पत्रक काढले आहे. त्यात म्हटले आहे, राज्य शासनाने सर्व अकृषी विद्यापीठे, सर्व शासकीय, अशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित तसेच मॉडेल डिग्री महाविद्यालये, तंत्रशिक्षण संचालनालय व कला संचालनालयाच्या आधिपत्याखालील अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्था, पदवी, पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था यांमध्ये मराठी भाषेतून नामफलक लावण्याची सक्ती केली आहे. सर्व संचालक, महाविद्यालये, तंत्रनिकेतने, परिसंस्था यांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून, योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेशात म्हटले आहे. याबाबत संबंधित संस्था, महाविद्यालयाचे प्राचार्य, सहसंचालक, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण यांनी वैयक्तिक लक्ष देऊन, खात्री करण्याचेही आदेश आहेत. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळेत इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी विषय शिकविणे सक्तीचे करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यानंतर आता मराठी फलकांच्या सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News