शस्त्रक्रियेद्वारे काढली महिलेच्या पोटातून तीन किलो वजनाची गाठ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 19 December 2019

१० सेमी लांबीचा मासांचा गोळा असलेली गर्भाशयाच्या पिशवीची शस्त्रक्रिया, पहिले दोन सिझेरियन असलेल्या महिलेची तिसऱ्यांदा सिझेरियन शस्त्रक्रिया, चाळीसवर्षीय महिलेला लग्नाच्या २५ वर्षांनंतर गर्भधारणा झाली होती, तिचे सिझेरियन करून त्या महिलेला मातृत्वाचा आनंद दिला

औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) साठवर्षीय महिलेच्या पोटातून तीन किलोंचा गोळा काढण्यात स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. कमलाकर मुदखेडकर, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कविता जाधव यांना यश आले. मिनी घाटीत चार डिसेंबर २०१८ मध्ये सुरू झालेल्या प्रसूतिगृहात दीड हजार प्रसूती तर दीडशेहून अधिक सिझेरियन प्रसूती पार पडल्या आहेत. 
   जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांपासून पोटदुखीच्या आजाराने त्रस्त परभणी जिल्ह्यातील परतूर येथील ६० वर्षीय महिला जिल्हा रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागात तीन डिसेंबरला दाखल झाली होती. परतूरला त्या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यास नकार दिल्याने त्या मिनी घाटीत आल्या होत्या. निदानानंतर डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी पोटात गोळा असल्याने  शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याची कल्पना नातेवाइकांना दिली. नातेवाइकांनी सहमती दिल्यावर डॉ. मुदखेडकर, डॉ. कविता जाधव यांच्या टीमने त्या महिलेची शस्त्रक्रिया करून पोटातील (२० बाय १२ बाय १० सेमी) आकाराचा तब्बल तीन किलोंचा अंडाकृती गोळा काढला. या शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञ डॉ. संजय चव्हाण, डॉ. वैशाली जाधव, डॉ. सिरसाठ, श्रीमती तपसे, डॉ. तृप्ती सानप, डॉ. स्मिता चव्हाण, श्रीमती घोरपडे, श्रीमती पोटे आदींसह परिचारिकांनी सहकार्य केले. शस्त्रक्रियेनंतर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी महिलेची भेट घेत शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्‍टरांच्या चमूचे अभिनंदन केले. 
मिनी घाटीचा चढता आलेख 
सहा महिन्यांपासून मिनी घाटीत गुंतागुंतीच्या किचकट शस्त्रक्रियाही व्हायला सुरवात झाली आहे. त्यामुळे सुरवातीपासून स्त्रीरोग विभागाचा आलेख चढता राहिलेला दिसतो. आतापर्यंत ५० वर्षीय महिलेच्या पोटातून दोन किलोंचा गोळा काढणे, योनीमार्गातून गर्भपिशवी काढणे, १० सेमी लांबीचा मासांचा गोळा असलेली गर्भाशयाच्या पिशवीची शस्त्रक्रिया, पहिले दोन सिझेरियन असलेल्या महिलेची तिसऱ्यांदा सिझेरियन शस्त्रक्रिया, चाळीसवर्षीय महिलेला लग्नाच्या २५ वर्षांनंतर गर्भधारणा झाली होती, तिचे सिझेरियन करून त्या महिलेला मातृत्वाचा आनंद दिला

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News