नारळाचे लाडू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 29 June 2020

आज खास तुमच्यासाठी ओल्या नारळाच्या लाडूच्या रेसिपी घेऊन आली आहे.

 आज खास तुमच्यासाठी ओल्या नारळाच्या लाडूच्या रेसिपी घेऊन आली आहे.

साहित्य :-

• २ कप खवलेला जाता नारळ
• १/२ कप साखर 
• १/२ कप दूध 
• १/२ चमचा वेलचीपूड
• २ चमचे बदामाचे काम

कृती :-

एका पातेल्यात खवलेला नारळ आणि दूध एकत्र करावे. मध्यम आचेवर उकळत ठेवावे. घट्टसर होत आले की, साखर घालावी. पातलेच्या तळाला नारळ चिकटू नये म्हणून ढवळत रहावे. 

वेलचीपूड आणि बदामाचे काप घालावे. मिश्रण घट्टसर होत आले की, गॅस बंद करावा आणि पातेले गॅसवरून उतरवावे. मिश्रण थोडे कोमटसर होवू द्यावे. गरज पडल्यास थोडा तुपाचा हात घेऊन लाडू वळावेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News