कोकोनट बिस्किट्स

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 June 2020

आता तुम्ही तुमच्या घरी सुध्दा कोकोनट बिस्किट्स तयार करू शकतात. 

आता तुम्ही तुमच्या घरी सुध्दा कोकोनट बिस्किट्स तयार करू शकतात. 

साहित्य :-

• १ वाटी मैदा 
• १ वाटी लोणी किंवा डालडा 
•  पाऊण वाटी पिठीसाखर
• १ चमचा व्हॅनिला
• अर्धा चमचा खायचा सोडा
• ५० ग्रॅम बाजारी आणि खोबऱ्याचा किस
• थोडे दूध

कृती :-

तूप आणि साखर एकत्र करून फेसावे. नंतर त्यात मैदा, व्हॅनिला, खोबऱ्याचा किस (थोडा वगळून) मिसळावे. सोडा घालावा. आवश्यक तेवढे दूध घालून पुरीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवावे.

त्याची जाड पोळी लाटून गोल बिस्कीटे कापावी. खोबऱ्याच्या किसात एका बाजूने बुडवून ट्रे मध्ये लावून गरम ओव्हमध्ये भाजावीत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News