आर यू आॅन क्लाउड?

सागर नांगरे
Monday, 9 November 2020

तुमचे साॅफ्टवेअर बनविण्यासाठी आणि ते कोणत्याही क्षमतेने ग्राहकांना देण्यासाठी लागणारे जे काही साॅफ्टवेअर आणि हार्डवेअर एन्व्हायरन्मेंट पाहिजे असते ते हवे तितक्या प्रमाणात पुरविणे. यालाच क्लाउड काॅम्प्युटिंग म्हणतात.

आर यू आॅन क्लाउड

- सागर नांगरे

लेखक हे टेक्नाॅलाॅजी ब्लाॅगर आहेत

असं म्हणतात की आपण मोठी स्वप्न पाहावीत.. विशेषतः उद्योग-व्यवसाय वाढवताना तर ही स्वप्न इतकी मोठी असावीत की समोरच्याने तुमच्यावर हसले पाहिजे. काही वर्षांपूर्वी ज्यांनी अशी स्वप्न पाहिली त्यांना त्यांच्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी खरंच खूप झगडावं लागलं. कारण व्यवसायाचं गणित जुळवताना झपाट्याने बदलणाऱ्या जगाबरोबर स्वतःला अपडेट ठेवणे तितकं सोपं नव्हतं.

तंत्रज्ञान कळणं आणि ते व्यवसायात आणणं यामध्ये खूप अंतर होतं. पण आज अनेकजण मोठी स्वप्न पाहताना शब्दशः ढगात जातात. गंमतीचा भाग सोडला तर खरोखरच आज परिस्थिती अशी आहे की तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर तो ढगावरच वाढवावा लागतो. अर्थात मी म्हणतोय ते ढग म्हणजे क्लाउड कम्प्युटिंगचे ढग आहेत.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने २००० च्या दरम्यान सर्वांनाच भूरळ घातली. मायक्रोसाॅफ्ट, आयबीएम, ओरॅकल, याहू अशा अनेक कंपन्यांचा दबदबा वाढला होता. तो काळ होता २००५ च्या आसपास. या आणि अशा कंपन्या मोठ्या झाल्या कारण त्यांनी नवीन साॅफ्टवेअर आणि हार्डवेअर तंत्रज्ञान विकसित करून व्यवसाय आणि जागतिक माहिती देवाणघेवाणीसाठी इंटरनेटचा वापर करत डिजिटल ट्रान्सफाॅर्मेशन करून घेतले.

पण हे या काही मोजक्या कंपन्यांनाच शक्य झाले होते. याचं कारण त्यांच्याकडे स्वतःचे डेटा सेंटर आणि त्यासाठी लागणारे सर्व्हर साॅफ्टवेअर होते. छोट्या कंपन्यांसाठी या साॅफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी लागणारे पूरक वातावरण (एन्व्हायरन्मेंट) तयार करणे परवडणारे नव्हते. तरीही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती होत होती. फक्त तिला वेग नव्हता. हा वेग आला तो खऱ्या अर्थाने २००६ मध्ये. 

अॅमेझाॅन ही कंपनी तुम्हाला माहितीच असेल. ई-काॅमर्समधल्या या अग्रगण्य कंपनीने २००६ च्या सुरवातीला अॅमेझाॅन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस) बाजारात आणले. त्यांचा उद्देश साधा सरळ होता. तुमचे साॅफ्टवेअर बनविण्यासाठी आणि ते कोणत्याही क्षमतेने ग्राहकांना देण्यासाठी लागणारे जे काही साॅफ्टवेअर आणि हार्डवेअर एन्व्हायरन्मेंट पाहिजे असते ते हवे तितक्या प्रमाणात पुरविणे. यालाच क्लाउड काॅम्प्युटिंग म्हणतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News