पबजी बंद होणं, हे मुलांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे; वाचा तरूणाईच्या प्रतिक्रिया
भारतात अनेक चिनी अॅपवरती सुरक्षेच्या अनुशंगाने बंदी घालण्यात आली. तसेच अनेक अॅप आणि गेमवरती बंदी येणार असल्याची शक्यता अनेकांनी त्यावेळी व्यक्त केली होती. व्यक्त केलेली शक्यता खरी ठरली असं म्हणायला हरकत नाही. कारण काही दिवसातचं पबजी अॅप बंद होणार असल्याची माहिती चाहत्यांच्याकानावर पडली आणि चाहते नाराज झाले. कारण दिवसरात्र त्यात व्यस्त असणारे अनेक चाहते निराश झाले काही सोशल मीडियावरती आपलं दु.।ख व्यक्त केलं , तर काहींनी भारतातल्या संशोधकांना तशा गेम का तयार करता येत नाहीत अशी शंकाही उपस्थित केल्या. यावर आम्ही व्हाट्सग्रुपच्या माध्यमातून तरूणाईच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
डेटा सेक्युरिटी, प्रायव्हसी पॉलिसी, आणि इतर बरीच कारणे पबजी गेमवर बंदीसाठी कारणीभूत ठरली. भारतात काल तिसऱ्या फेजमध्ये ११८ अॅप्सवर बंदी घालण्यात आली. याआधी TikTok, UC Browser यासारखी अॅप्स देखील भारतात बंद करण्यात आलेली आहेत. यातील काही ऍप्स युजर्सचा सेन्सिटिव्ह डेटा चोरत किंवा त्या डेटा चा दुरुपयोग करत असल्याचे ज्यावेळी लक्षात आले, तेव्हा सरकारने या विरोधात आता पाऊले उचलायला सुरू केले आहे आणि जे युजर्स साठी चांगलेच आहे. असं मत केदार जोशी यांनी मांडलं
त्यानंतर ईश्वरी मुरुडकर यांनी भारत आणि चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला तो म्हणजे सगळे चीनी अॅप बंद करण्यात आले. यात ११८ अॅप सोबत पबजी हे अॅप सुद्धा बंद करण्यात आले. सर्व तरुणांमध्ये लोकप्रिय असे अॅप होते. ते बंद झाल्यामुळे सध्या तरुणांमध्ये नाराजीचा सूर आहे. तसेच पालकांनी या निर्णयाचा आनंद व्यक्त केला.
एकंदरीत चीन सरकार चा निषेध म्हणून अॅप बंद केले ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे तरुण या खेळापासून मुक्त झाले. आणि चीन सरकारचा निषेध हा उद्देश सुद्धा साध्य झाला असं व्यक्त केलं
जून महिन्यात गलवान खोर येथे चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. त्यामध्ये भारतीय सैनिक शहीद झाले होते. या गोष्टीचा निषेर्धात चिनी वस्तूवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेण्ड निघाला. एकंदरीत हे उत्तम झालं. कारण त्यामुळे भारतातील तरुण पिढी ज्या वयात बौद्धिक विकासाचा पाया असतो. त्याच वयात विकास कुठे तरी खुंटला जात होता. हे दिसून येत होत आणि राहिला प्रश्न ज्यांना मनोरंजन या गोष्टीला आडकाठी आली असेल. तर त्यांनी भारतात जे भारतीय अॅप बनवले जाते.अशा गोष्टींची सवय लावून घ्यावी. जेणे करून आपण प्रगती पथावर पाऊल टाकत होत आहोत हे सिद्ध होईल. माझं असं कणखर मत आहे की भारतीने आत्मनिर्भर झालं पाहिजे. ज्यामध्ये देशाचा सर्वागीण विकास होईल. मला असं वाटतं की देश हा आपला आहे समजून जगावं. कारण आपण आपल्या देशाचं देणं आहोत. संविधानाने आपल्याला मतदानाचा आधिकार दिला आहे. आपली मतदान पद्धत ही प्रौढ मतदान पद्धत आहे. त्यामुळे आपल सरकार हे आपण निवडून दिलेलच असत. त्यामुळे त्या निर्णयाच पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. असं मतं मनिषा काशिद यांनी व्यक्त केलं.
पब्जी गेमवर भारतात आणलेली बंदी योग्य आहे. या गेममुळे मुले तासन्तास मोबाईलवरती खेळत असतात. तर त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर व आरोग्यावर होत आहे. या गेममुळे मुलांच्यामध्ये संवादाची कमतरता होती, मुले घरातील व्यक्ती पासून दूर होत होती . मुलांमध्ये मैदानी खेळ बंद झाले त्याचा परिणाम मुलांच्या बौद्धिक व शारीरिक वाढीवर होत आहे, मुले एकाकी व व मानसिक रुग्ण झाले आहेत. असं मतं निसार नायकवडी यांनी व्हॉट्सग्रुपवरती नोंदवलं.