तरुणांमुळे शहराची सांस्कृतिक उंची वाढतेय

सकाळ वृतसंस्था (यिनबझ)
Thursday, 14 March 2019

पिंपरी - साऽ रेऽ, रेऽ गऽ, गऽ मऽ... असे सूर एकीकडे ऐकू आले. त्याचवेळी दुसऱ्या कक्षातून हार्मोनिअमचे स्वर कानी पडले. थोडं पुढे गेल्यावर ‘धाऽ धींऽ धींऽ धाऽ... धाऽ तींऽ तींऽ ताऽ...’ या तबल्याच्या बोलांनी लक्ष वेधून घेतले. प्रत्येक कक्षात विद्यार्थी भारतीय बैठकीत बसलेले होते. यात महिला व मुलींची संख्या लक्षणीय होती. गुरुजी तन्मयतेने शिकवत होते. शिष्य एकाग्रतेने ऐकून गुरुजींप्रमाणे गायन, वादन करीत होते. असे चित्र बुधवारी (ता. १३) महापालिकेच्या निगडीतील संगीत अकादमीत बघायला मिळाले.
 
शहरातील मुलांना तबला व हार्मोनिअम वादनासह शास्त्रीय व सुगम गायनाचे धडे सहजासहजी मिळावेत, उच्च दर्जाचे सांगीतिक शिक्षण मिळावे, उत्तमोत्तम कलावंत घडावेत, शहराचा सांस्कृतिक दर्जा उंच व्हावा, या उद्देशाने महापालिकेने २००१ मध्ये संगीत अकादमीची स्थापना केली. महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत गुरुकुल पद्धतीने संगीत अकादमीचे काम सुरू आहे. तिचे मुख्यालय निगडीतील संत तुकाराम व्यापारी संकुल इमारतीत आहे. चिंचवड, शाहूनगर व संत तुकारामनगर या तीन शाखा आहेत. तेथे विद्यार्थ्यांना गायन व वादनकला शिकवली जाते. 

मासिक संगीतसभा अथवा स्वरसागर संगीत महोत्सवानिमित्त अकादमीच्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. अगदी दहा वर्षांच्या मुलांपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठांपर्यंतच्या व्यक्तींना अकादमीत प्रवेश दिला जातो. त्यांना संगीताचे धडे देण्यासाठी स्मिता देशमुख, नंदीन सरीन, वैजयंती भालेराव (गायन); समीर सूर्यवंशी, विनोद सुतार, संतोष साळवे (तबला) आणि उमेश पुरोहित, मिलिंद दलाल, वैशाली जाधव (हार्मोनिअम) हे शिक्षक कार्यरत आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News