घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जाणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 23 May 2020

या वाहनांद्वारे मुंबईत ठिकठिकाणी कोरोना साथीबाबत नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे.

मुंबई : शहर उपनगरातील नागरिकांच्या तपासणीसाठी मुंबई महापालिकेच्या वतीने तेरा फिरती वैद्यकीय वाहने सुरू केली आहेत. या वाहनांद्वारे मुंबईत ठिकठिकाणी कोरोना साथीबाबत नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे.

कोरोनाबाधित नसलेल्या रुग्णांना सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार मिळत नाही, अशी तक्रार करणारी जनहित याचिका न्यायालयात करण्यात आली आहे. त्यावर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. त्यावेळी पालिकेने ही माहिती दिली. तसेच या वाहनांद्वारे घरोघरी जात नागरिकांची तपासणी सुरू आहे, असेही पालिकेतर्फे सांगण्यात आले; मात्र ही वाहने कुठे उपलब्ध असतात. त्या प्रभागांमध्ये फिरतात का?, असे प्रश्‍न याचिकादारांच्या वतीने विचारण्यात आले. याबाबत सविस्तर तपशील दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने पालिकेला दिले असून पुढील सुनावणी 26 मे रोजी होणार आहे. उपचार न मिळाल्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा याचिकेत केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News