चंकी पांडेचा मराठी चित्रपट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 30 December 2019

चंकी म्हणतो, ‘मराठी चित्रपटात काम करायची माझी इच्छा होतीच. फक्त मी चांगल्या कथेची वाट पाहत होतो. ‘विकून टाक’ चित्रपटाची कथा जेव्हा माझ्या समोर आली, तेव्हा मी लगेचच या चित्रपटास होकार दिला.’

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा बॉलीवूड अभिनेता म्हणजे चंकी पांडे. मोठ्या पडद्यावरील चंकीच्या विनोदी भूमिका कायम सिनेरसिकांच्या लक्षात राहिल्या. बॉलीवूडमधील हा प्रसिद्ध कलाकार आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे.

‘विकून टाक’ या चित्रपटात तो एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. याबाबत चंकी म्हणतो, ‘मराठी चित्रपटात काम करायची माझी इच्छा होतीच. फक्त मी चांगल्या कथेची वाट पाहत होतो. ‘विकून टाक’ चित्रपटाची कथा जेव्हा माझ्या समोर आली, तेव्हा मी लगेचच या चित्रपटास होकार दिला.’

शिवाय चंकीला मराठी भाषाही चांगली बोलता येते. हा चित्रपट ग्रामीण भागातील समस्यांवर आधारित आहे. समीर पाटील दिग्दर्शित या चित्रपटात शिवराज वायचळ, समीर चौघुले, ऋजुता देशमुख आदी कलाकारही दिसणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News