पुण्यातलं झणझणीत चवीचं हॉटेल म्हणजे चूल मटण-2

सुरज पाटील (यिनबझ)
Wednesday, 11 September 2019
  • एकदम भन्नाट, तिखट आणि चवीला लाजवाब ते जेवण 10 वर्षांची भूक भागवेल यापैकी होतं.
  • जेवण अगदी पुणेकरांच्या स्टाईलमध्येच होत, ते म्हणजे जगात लई भारी.

पुणे : महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने बाहेर पडल्यावर पुण्यामध्ये पहिली वस्ती राहायचं ठरलं. तस पुणेकर म्हणजे तिथे राहणाऱ्यांसाठी भारीच, पण ठरलं म्हणून राहावं लागलं. राहायचं म्हटलं म्हणून पुण्याच्याच एका हॉटेलमध्ये आमचा जेवणाचा बेत ठरला. ते हॉटेल होतं चूल मटण-2. 2 हा आकडा यासाठी की तिथे त्याच मालकाच कोथरूड रोडला एक हॉटेल आहे आणि हे हॉटेल आहे पुण्याच्या phoinax mall च्या शेजारी. अशाप्रकारे हॉटेलचं नाव मी पहिलीवेळ ऐकलं आणि अशा हॉटेलमध्येसुद्धा जेवनसुद्धा पहिली वेळ जेवलं. हॉटेलमध्ये प्रवेश केलाच, तर अगदी एखाद्या बैठकीच्या राजवाड्यात प्रवेश केल्यासारखं वाटतं.

दरवाजाच्या आत प्रवेश केल्यावर 7 ते 8 फूट उंचीचा दीपस्तंभ. डाव्याबाजूला नजर फिरवली की शिवाजी महाराज, संभाजी महाराज, चुलीवर जेवण बनवणाऱ्या स्त्रिया, शेतात राबणारे शेतकरी अशाप्रकारची चित्र रेखाटलेली दिसतील, तर समोर एकदम बैठकीनुसार पुणेरी आणि पेशवाई पद्धतीनुसार बैठका कोणताही झगमगाट नसताना अगदी सौम्य प्रकाश केलेली रोषणाई, तेही अगदी दिवाबत्तीनुसार असा सगळा काही पेशवाईच्या स्वयंपाकगृहात मांडलेल्या थाटाप्रमाणे यो साज होता. बेशक तो माहोल पेशवाईचाच होता.

सगळं हॉटेल न्हाहळून झाल्यावर आम्ही सर्व बैठकीवर बसल्यावर पहिला पदार्थ आला यो म्हणजे मटणसूप (फोडणी देऊन शिजवलेल्या मटणाचे पाणी). त्यांनतर एका थाळीतून मटणसुक्का, मटण मसाला आणि ज्वारीची भाकरी असा मेन्यू आला. एकदम भन्नाट, तिखट आणि चवीला लाजवाब ते जेवण 10 वर्षांची भूक भागवेल यापैकी होतं. या सगळ्यात भर म्हणजे मऊशार भात.

हॉटेल मालकाच्या शेतात उगवलेला तो भात होता इंद्रायणी नावाचा. तोंडात टाकला की विरघळण्यासारखा यो भात होता. तृप्त जेवण करून तटावरून उठतोय म्हणजे त्याच हॉटेलमध्ये बनवलेले गुलाबजामन आणले गेले. मटणाच्या जेवणावर गोड गुलाबजामन हा संशोधनाचा जरी विषय असला तरी तो खाण्यासाठी मस्तच होता आणि या सगळ्यावर भर म्हणजे तिथली स्पेशल सोलकडी. जेवण अगदी पुणेकरांच्या स्टाईलमध्येच होत, ते म्हणजे जगात लई भारी.

पत्ता - नगर रोड, जुना जकातनाका, खांदेव नगर, पुणे, महाराष्ट्र - 411014

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News