आयपीएलच्या इतिहासात ख्रिस जॉर्डनचा सर्वांत महागडा ओव्हर; एकाच सामन्यात दोन 'अनोखे' रेकॉर्ड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 22 September 2020

शेवटी ख्रिस जॉर्डनच्या ओव्हरमध्ये स्टोनिसने 30 धावा काढल्या, त्यामुळे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा जॉर्डनचा 20 वा ओव्हर ठरला.

आयपीएलचा थरारक अनुभव काल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. इंडियन प्रीमियर लीगचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्या रंगला. प्रथम क्रमांकाचे फलंदाज शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि शिमरॉन हेटमीयर यांचे पंजाबने विकेट चाटकावले, त्यामुळे दिल्लीला मोठा धक्का बसला.

पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांच्यात समन्वय नसल्यामुळे धवल रन आऊट झाला. दिल्लीचा गोलंदाज मोहम्मद शमीने फलंदाज शॉ आणि हेटमीर दोन विकेट चटकावले आणि दिल्लीला तिसरा जबरदस्त धक्का दिला. यावेळी दिल्लीचे 13 रनवर 3 विकेट होते. दिल्लीचा कर्णधार अय्यर आणि पंत यांनी चमदार कमागीरी करुन 73 धावांची भागीदारी केली. त्यामुळे दिल्लीचा डाव सावरला. मात्र जास्त काळ ही भागेदारी टिकली नाही.

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्कस स्टोनिसने धडाकेबाज कामगीरी केली. 150 धावांचा टप्पा गाठण्यासाठी 21 बॉलमध्ये 53 धावांची कामगीरी केली. शेवटी ख्रिस जॉर्डनच्या ओव्हरमध्ये स्टोनिसने 30 धावा काढल्या, त्यामुळे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा जॉर्डनचा 20 वा ओव्हर ठरला. या पुर्वी 2017 मध्ये पुणे रायझींग संघाचा गोलंदाज अशोक दिंडा यांच्या 20व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्यांनी 30 रन काढले होते. त्यामुळे गोलंदाजीच्या यादीत अशोक दिंडा प्रथम तर ख्रिस जॉर्डन यांचा दुसरा क्रमांक लागला.

जार्डनच्या पहिल्या बॉलवर स्टोनिसने सिंक्सर लगावला. त्यामुळे जार्डन भांबावून गेला होता. दुसरा बॉल वाईट गेला. त्यानंतर सलग तीन चौकार मारुन स्टोनिसने हॉट्रीक केली. स्टोनिकने आणखी एक सिक्सर लगाला. त्याबरोबर पेनल्टी बॉलर स्टोनिसचे अर्ध शतक पुर्ण झाले. शेवटच्या बॉलवर स्टोनिसने पहिला धावा पूर्ण केला परंतु दुसरा धाव घेताना बाद झाला. तो नो बॉल ठरला. जार्डनच्या अतिरिक्त बॉलचा सामना करण्यासाठी नॉर्टजे अजूनही क्रिसवर होता. नॉर्टजेने सुपर शॉर्ट लागावला आणि तीन धावा काढल्या. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल संघाचा फलंदाज स्टोनिसने सर्वांत वेगवान अर्धशतक बणवण्याचा नवा विक्रम केला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News