"चॉपस्टिक" वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

संतोष भिंगार्डे
Thursday, 16 April 2020

सध्या वेबसीरिज आणि हिंदी चित्रपट असा तिचा प्रवास सुरू आहे. तिने "चॉपस्टिक' या हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे आणि हा चित्रपट प्रेक्षकांना नेटप्लिक्‍सवर पाहता येईल. यामध्ये अभिनेता अभय देवोल हा तिचा सहकलाकार आहे

"लिटिल थिंग्स', "गर्ल इन सिटी' यांसारख्या वेबसीरिजमध्ये काम करणारी आणि एकूणच वेबविश्‍वामध्ये धमाल उडविणारी अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर. मध्यंतरी तिने एका मराठी चित्रपटामध्येही काम केले होते. त्याचे नाव "मुरांबा'. त्यावेळी या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला होता; परंतु ती मराठी चित्रपटामध्ये अधिक अडकून न पडता वेबविश्‍वात आपला चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. सध्या वेबसीरिज आणि हिंदी चित्रपट असा तिचा प्रवास सुरू आहे. तिने "चॉपस्टिक' या हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे आणि हा चित्रपट प्रेक्षकांना नेटप्लिक्‍सवर पाहता येईल. यामध्ये अभिनेता अभय देवोल हा तिचा सहकलाकार आहे. या दोघांचा सहजसुंदर अभिनय या चित्रपटात पाहायला मिळतो.

ही कथा मुंबईत घडते. या चित्रपटात निरमा नावाच्या मुलीची नवी कोरी कार पहिल्याच दिवशी संध्याकाळी चोरीला जाते. ती कार कुणी चोरली याचा शोध निरमा घेण्यास सुरुवात करते. त्याकरिता तिला मदत होते ती अभयची. हा शोध सुरू असताना निरमा कित्येक लोकांना भेटते. त्यांना ती तिच्या कारबद्दल विचारते आणि एकूणच या प्रवासामध्ये तिचा आत्मविश्‍वास हरवितो आणि मग तो पुन्हा कसा काय प्राप्त होतो अशीच साधारण ही कथा आहे.

निरमाची भूमिका मिथिलाने केली आहे. एका टुरिस्ट गाईडची ही भूमिका आहे. यामध्ये मिथिला पारकर, अभय देवोल यांच्यासह विजय राज, अरुण कुशवाह यांच्याही भूमिका आहेत. अरुण कुशवाह यांची भूमिका सरप्राईज आहे. विजय राज यांच्या अभिनयाचा यूएसपी म्हणजे एखाद्या गंभीर अभिनयातही प्रेक्षकांना हसवितात. अशीच त्यांच्या अभिनयाची छबी "चॉपस्टिक' मध्येही पाहायला मिळते. सचिन यार्दी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News