तुमच्या आमच्या मनातला चॉकलेट डे

सुरज पाटील
Saturday, 9 February 2019

चॉकलेट डेचे अशेही फायदे

व्हॅलेंटाइन वीकचा तिसरा दिवस म्हणजेच चॉकलेट डे.
प्रत्येकालाच आवडणारा पदार्थ म्हणजे चॉकलेट. 
चॉकलेटचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, तर काही मन रमवण्यासाठी आहेतच.
काहीजण मूड फ्रेश करण्यासाठी चॉकलेट खातात, तर काहीजण स्मरणशक्ती वाढवण्यासाठी चॉकलेट खातात. 

चॉकलेट डे हा जरी पश्चिमी संसकृतीचा उत्सव असला, तरी त्या उत्सवाला भारताच्या तरूणाईने आपलंसं केलं आहे. प्रत्येकाच्या जीवनात चॉकलेट डे, एक नविन उर्जा, नविन चव आणि नवा साथीदार देखील घेऊन येतो. अशाच तुमच्या आमच्या मनातील चॉकलेट डेची कहाणी आज आपण बघणार आहोत.

आपल्या मित्र मैत्रिणींसोबत कितीही भांडण झाले तरी, आपण सॉरी बोलतो, माफी मागतो त्याचप्रमाणे एक चॉकलेटही देऊन समोरच्याचा किंवा आपल्यातला रुसवा काही क्षणासाठी काढून टाकतो. त्यामुळे आपल्या जिवलग मित्र-मैत्रीणींसाठी चॉकलेट डे हा दिवस खूप महत्वाचा आहे. कोणतेही छोट्यात छोटे का असेना; पण आपण आपल्या मित्रांना चॉकलेट देऊन आपली निखळ मैत्री अजून घट्ट बनवत असतो.

काहीजण आपल्या आई वडिलांना आपले प्राणप्रिय मानतात, तर काहीजण आपल्या भावंडाना मानतात. काही तरूण मंडळी तर आपल्या मित्रांना सगळ्यात जवळचे आदर्श मानतात, काही लोक आपल्या प्रेमाच्या आणि आयुष्याच्या जोडीदाराला आपला जिवलगा मानत असतात. अशा सर्वांसाठी चॉकलेट डे हा खासच असतो.

कोण आपल्या घरच्यांना चॉकलेट देऊन खूष करतो, तर कोण आपल्या मित्र-मैत्रीणींना चॉकलेट देऊन आनंद व्यक्त करत असतो. प्रत्येक तरुणाच्या आयुष्यात त्यांच्या हक्काचे कोण ना कोण तरी चॉकलेटचा हकदार असतोच आणि काही हकदार असावेच, जे आयुष्य जगायला खूप मदत करत असतात.

चॉकलेट डेचे अशेही फायदे

व्हॅलेंटाइन वीकचा तिसरा दिवस म्हणजेच चॉकलेट डे.
प्रत्येकालाच आवडणारा पदार्थ म्हणजे चॉकलेट. 
चॉकलेटचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, तर काही मन रमवण्यासाठी आहेतच.
काहीजण मूड फ्रेश करण्यासाठी चॉकलेट खातात, तर काहीजण स्मरणशक्ती वाढवण्यासाठी चॉकलेट खातात. 
रोगप्रतिकार शक्तीही वाढण्यास चॉकलेटची फार मदत होते.
तणाव कमी व्हावा, कामात मन रमावं म्हणून आपण चॉकलेटचा अधिक उपयोग करत असतो.
उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना देखील चॉकलेट परिणामकारक ठरते.
हृदयासाठी आणि रक्तदाबासाठी चॉकलेट फायदेशीर आहे. 
चॉकलेटच्या सेवनाने हृदयरोगाची शक्यता कमी होते. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News