प्रेमाचा गोडवा वाढवणारा 'चॉकलेट डे'

शिल्पा नरवडे
Sunday, 9 February 2020

मैत्री संबंध वाढवण्यासाठी किंवा प्रियकर- प्रेयसी यांच्या नात्यात आयुष्यभर गोडवा राहण्यासाठी खास करून हे प्रेमीयुगल एकमेकांना आवर्जून चॉकलेट डे ला वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट देऊन आपल्या नात्याला घट्ट करतात.

१४ फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा दिवस. यानिमित्त सगळीकडेच तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते आहे. आठ दिवस अगोदरपासूनचं सुरू झालेले विविध 'डे' तरुणाई मोठ्या उत्साहात साजरे करत आहे. रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमीस डे, किस्स डे, हग डे मिळून प्रेमाचा आठवडा साजरा करतात. आज चॉकलेट डे आहे. यानिमित्त जगभरातील प्रेमयुगी हा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करतात. 

भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही कार्याची सुरवात ही गोड पदार्थाने केली जाते. कारण कोणतेही चांगले काम सुरू करण्यापूर्वी तोंड गोड केले जाते. अगदी अशाच प्रकारे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चॉकलेट डे साजरा केला जातो. 'चॉकलेट डे' हा व्हॅलेंटाइन आठवड्याचा तिसरा दिवस असतो. हा दिवस प्रत्येक वर्षी 9 फेब्रुवारीला येतो. प्रियकर-प्रेयसी, मीत्र- मैत्रिण आणि सर्व वयाचे लोक एकत्र येऊन चॉकलेट डे आनंदाने साजरा करतात.  

चॉकलेट डे हा लहान व्यक्तींपासून मोठ्यापर्यँत सर्वांचा आवडता दिवस असतो. कारण प्रत्येक व्यक्ती ही एकमेकांमधील कडवटपणा बाजूला ठेऊन चॉकलेट देतात. महाराष्ट्रातील सर्व तरुणाई एकमेकांना चॉकलेट देऊन हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात. 

या खास दिवसामध्ये व्यक्ती वेगवेगळ्या दुकानांमधून आकर्षित करणारी स्वादीष्ट मिठाई घेऊन येते. एकमेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोड भेटवस्तू देऊन चॉकलेट डे मोठ्या आनंदाने साजरा करतात. चॉकलेट डेच्या निमित्ताने नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी नातेवाईक एकत्र येतात. तसेच इतर कोणत्याही वेळी चॉकलेट दिल्याने समोरील व्यक्तीचे सर्व दुःख, गैरसमज दूर होतात. 

लहान मुलांच्या हातात जर चॉकलेट दिले तर त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य पाहून क्षणात दु:ख नाहीसे होते. मैत्री संबंध वाढवण्यासाठी किंवा प्रियकर- प्रेयसी यांच्या नात्यात आयुष्यभर गोडवा राहण्यासाठी खास करून हे प्रेमीयुगल एकमेकांना आवर्जून चॉकलेट डे ला वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट देऊन आपल्या नात्याला घट्ट करतात. अशा प्रकारे चॉकलेट डे सर्वाना हवाहवासा वाटतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News