चिमुकल्यांनी जिंकली रसिकांची मने... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थित रसिक भारावले. विद्यार्थ्यांनी बालगीते, लावण्या, देशभक्तीपर गीते यावर नृत्य करून रसिकांची मने जिकंली. 

सातगाव पठार :  मतेवाडी (ता.आंबेगाव) येथील प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सिनेअभिनेत्री ऐश्वर्या दौंड यांच्या उपस्थितीत पार पडले. या वेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थित रसिक भारावले. विद्यार्थ्यांनी बालगीते, लावण्या, देशभक्तीपर गीते यावर नृत्य करून रसिकांची मने जिकंली. 

याप्रसंगी वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमात व क्रीडा स्पर्धांमध्ये विजय मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. दरम्यान, शाळेला वस्तू स्वरूपात मदत करणाऱ्या दानशूरांचे प्रमाणपत्र देऊन जाहीर आभार मानण्यात आले. स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षपदी गटशिक्षणाधिकारी पोपट महाजन होते. याप्रसंगी केंदप्रमुख विजय सुरकुले, समिती अध्यक्ष ठकसेन गवारी, आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर, कुरवंडीचे उपसरपंच विकास बारवे, सुनील तोत्रे, संतोष राक्षे, राजेंद्र शेळकंदे, अरविंद मोढवे, सागर हगवणे, संतोष उभे, शिवाजी मते, धोंडिबा मते, दगडू मते, गंगाराम मते, शंकर मते, नामदेव मते, परशुराम मते, दीपक मते, अशोक मते, सुभाष मते, बाळू मते, संजय माळुंजे, कैलास माळुंजे, संतोष पारधी, लतिका मते, वैशाली माळुंजे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जितेंद्र माळुंजे यांनी केले. मनोजकुमार सरदार यांनी सूत्रसंचालन तर मनीषा भोईर यांनी आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News