गर्भाशयात जुळ्यांचं भांडण ! जुळ्यांच्या भांडणाचा VIDEO व्हायरल 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 April 2019

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आईच्या गर्भाशयात दोन जुळ्या मुली एकमेकांशी हालचाली करताना दिसत आहेत.

चीन: मातेच्या गर्भाशयातून जन्म झाल्यानंतर दोन भावंड एकमेकांशी भांडण करतात हे आपल्याला माहित आहे...याबद्दल आपण नेहमी ऐकत असतो...पण, गर्भाशयातही जन्माआधीच जुळी मुलं भांडण करतात हे तुम्हाला माहित आहे का...? हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल पण हे खरं आहे...

लहान मुलं एकमेकांशी भांडण करतात हे आपण पाहिलंय, पण चक्क गर्भाशयातच जुळी मुलं भांडण करत असल्याचं आता व्हिडीओत पाहायला मिळालंय... चीनमध्ये एका मातेची सोनोग्राफी करत असताना डॉक्टरांना आश्चर्याचा धक्काच बसला...कारण, या मातेच्या गर्भाशयामधील जुळी मुलं एकमेकांशी भांडण करताना दिसली... या व्हिडीओत पाहा, जुळी मुलं गर्भाशयात भांडत असल्याचं स्पष्ट दिसतंय...एकमेकाला हातानं मारत असल्याचं पाहायला मिळतंय... या अल्ट्रासाउंड व्हिडीओबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्यायत...

पाहा हा व्हिडीओ

 

मिळालेल्या माहितीनुसार, 'गर्भाशयातील भांडणाचा व्हिडीओ साधारणतः वर्षभरापूर्वी व्हायरल करण्यात आला होता...ही महिला चार महिन्यांची गर्भवती होती आणि ती जुळ्या बाळांना जन्म देणार होती... त्यावेळी तिने चीनमधील यिनचुआनमध्ये एका क्लिनिकमध्ये अल्ट्रासाउंड केलं होतं...त्यावेळी या बाळांच्या वडिलांनी भांडणाचा प्रसंग कॅमेऱ्यात कैद केला...हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला...गंमत म्हणून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल केला जातोय...

या महिलेची आता प्रसूती झाली असून, तिने दोन मुलींना जन्म दिलाय...एकीचं नाव चेरी आणि दुसरीचं नाव स्ट्रॉबेरी ठेवण्यात आलंय...पोटात असताना दोघी भांडत होत्या...पण,आता दोघींचे एकमेकींवर खूप प्रेम असल्याचं पहायला मिळतंय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News