बालपण हरवताना................

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 23 December 2019

सोयगाव : संगणकाच्या युगात लहान मुलांचे विविध पारंपरिक खेळ हद्दपार होत आहेत. मोबाईल, लॅपटॉप, संगणक, व्हिडिओ गेम आदी आधुनिकीकरणाच्या बाबी उपलब्ध झाल्या आहेत. संगणकीय युगात लहान मुलांचे गलोर, विटी-दांडू, लपाछपी, गोट्या-गोट्या, आंधळी कोशिंबीर, राजा-राणी, लिंगोरचा, भोवरा फिरवणे, आळीसुळी, डबा गुल असे कितीतरी खेळ हरवले आहेत. लहान मुले संगणक व मोबाईलमधील गेमला पहिली पसंती देत आहेत. 

सोयगाव : संगणकाच्या युगात लहान मुलांचे विविध पारंपरिक खेळ हद्दपार होत आहेत. मोबाईल, लॅपटॉप, संगणक, व्हिडिओ गेम आदी आधुनिकीकरणाच्या बाबी उपलब्ध झाल्या आहेत. संगणकीय युगात लहान मुलांचे गलोर, विटी-दांडू, लपाछपी, गोट्या-गोट्या, आंधळी कोशिंबीर, राजा-राणी, लिंगोरचा, भोवरा फिरवणे, आळीसुळी, डबा गुल असे कितीतरी खेळ हरवले आहेत. लहान मुले संगणक व मोबाईलमधील गेमला पहिली पसंती देत आहेत. 
संगणकातील डिजिटल गेम, मोबाईल गेम खेळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे. ग्रामीण भागातही विटी-दांडू, आळीसुळी, राजा-राणी, भोवरा फिरवणे आदी खेळ मुख्यत्वे करून खेळले जायचे. त्यात लहान मुलांना खूप मजा वाटायची. शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातही क्‍लासेसच्या सुविधा आल्या. त्यामुळे मुले दिवसभर शाळा, नंतर क्‍लास व वेळ मिळाला तेव्हा संगणकावर किंवा मोबाईलवर दिसतात. परिणामी बाहेरचे खेळ त्यांना माहिती होत नाहीत. येणाऱ्या काळात मुलांना मैदानी खेळांची फक्त माहिती असणार आहे. पाचवीच्या मुलाच्या हातातही मोबाईल असतो व तो मोबाईलवर डिजिटल गेम खेळताना दिसतो. मात्र, मुलांना मैदानी खेळांची माहिती नसते. मुले मैदानी खेळ खेळत नसल्याने त्यांचा व्यायामही होत नाही. त्यामुळे त्यांच्या शरीराची हालचाल होत नाही व ते आजारी पडतात. त्यामुळे पालकांनी मुलांना खेळाचे महत्त्व समजावून सांगणे गरजेचे आहे. पूर्वीप्रमाणे कोणीही आता मैदानी खेळ खेळताना दिसत नाहीत. खरंच आता शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही मैदानी खेळांची मजा हरवत चालली आहे.

#बालकांच्या डोळ्यांवर परिणाम
लहान मुलांसह तरुणाने मोबाईलला मित्र बनविले आहे. अनेक जण कानात हेडफोन घालून आपल्याच नादात राहतात. लहान मुले मोबाईलशिवाय राहतच नाहीत. एकतर कार्टून्स बघतात. नाहीतर त्यांना काही काळ का होईना मोबाईल द्यावा लागतो, अशी स्थिती घराघरांत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे कमी वयातच डोळे तपासण्यासाठी जाण्याची वेळ पालकांवर येत आहे.   

आधुनिकीकरणाच्या युगात लहान मुलांना मैदानी खेळांची फार कमी प्रमाणात माहिती आहे. मोबाईल, लॅपटॉप, संगणक अशी आधुनिक साधने आल्यामुळे लहान मुले त्यांच्याकडे आपोआपच आकर्षली जात आहेत. त्यामुळे लहान मुलांना मैदानी खेळ व व्यायामाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे.
- सुनील आहेर, प्राथमिक शिक्षक, शेवाळेनगर
------

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News