मुलांचा लठ्ठपणा वाढतोय? अशी घ्या काळजी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 24 November 2019

बदलत्या काळामध्ये  मुलंदेखील बदलत चालली  आहे तसेच खाण्याच्या पद्धती, मैदानी खेळ खेळण्याचा अभाव यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढू लागली आहे.

बदलत्या काळामध्ये  मुलंदेखील बदलत चालली  आहे तसेच खाण्याच्या पद्धती, मैदानी खेळ खेळण्याचा अभाव यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढू लागली आहे. मैदानी खेळ सोडून आताची पिढी मोबाइलमध्ये गुंतलेली आहे त्यामुळे त्यांना मैदानी खेळ काय हे देखील माहित नसतं. हा लठ्ठपणा पुढे जाऊन नैराश्‍याचे कारण होऊ शकतो. लठ्ठपणा आणि मानसिक आरोग्य यांचा फार जवळचा सबंध आहे. 

* ज्या मुलींचा BMI (Body Mass Index) आवश्यकतेपेक्षा अधिक असतो, अशा मुलींना मुलांच्या तुलनेत नैराश्य लवकर ग्रासते.
 
​* मुलांची उंची आणि वजन यासोबतच त्यांच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेडसावणाऱ्या भावनिक समस्यांची माहिती घेतली पाहिजे.
 
* मुलांना अनेकदा आपल्याला आजार जडला आहे, याची माहिती नसते. यासाठी पालकांनीच पुढाकार घेऊन त्यांना गरज पडल्यास डॉक्टर अथवा समुपदेशकाकडे न्यायला हवे.
 
* मुलांची उंची आणि वजन यासोबतच त्यांना वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेडसावणाऱ्या भावनिक समस्यांची पालकांनी माहिती घेतली पाहिजे.
 
* वयाच्या तिसऱ्या, पाचव्या, सातव्या, अकराव्या आणि चौदाव्या वर्षी मुलांच्या वर्तनात होणारे बदल लक्षपूर्वक पाहिले पाहिजेत.
 
* सातव्या वर्षापासून लठ्ठपणा आणि भावनिक समस्यांचा एकमेकांशी असलेला संबंध उघड व्हायला सुरुवात होते. त्यापूर्वी या दोन्हींमधला संबंध स्पष्टपणे दिसून येत नाही.
 
* बऱ्याचदा लोकांना असे वाटते, की कमी खाल्ले आणि अधिक व्यायाम केल्यावर काहीच त्रास होणार नाही. पण हे इतके सोपे नसते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News