मुलांना नोकरी करणारीचं मुलगी हवी कारण...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 9 August 2019

मुलांना आता नोकरी, घर आणि सारे काही सांभाळणारी पत्नी हवी आहे. मुलं असो वा मुली दोघांनाही जोडीदार असा हवाय जो  कामाला जाणार असेल. पण याच्या मागचं कारण काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? नोकरी करणारी मुलगीच पत्नी म्हणून का हवी? जाणून घेऊ कारणे..

बायको म्हटली की, तिच्याकडे फक्त "चूल आणि मुल" या दोन्हीचं गोष्टींच्या नजरेने पाहिले जायचे आजच्या काळात सुंदर, सुशील आणि केवळ घर सांभाळणाऱ्या पत्नीचा ट्रेन्ड मागे पडला आहे. 

दोघेही कामाला जातात म्हणून एकमेकांमध्ये सामंजसपणा मोठ्या प्रमाणात राहतो आणि यांवरून त्यांचा फायदा असा होतो की, ते आपल्या  घरात आणि समाजात आधिक चांगल्या पध्दतीने वावरतांना दिसतात. त्यामुळे आपल्या कुटूंबाला अधिक चांगल्या पद्धतीने चालवणं, सगळ्यांना घेऊन चालणे हे अधिक उत्तमरीत्या त्यांना जमत असते. 

जर तुमची पत्नीही नोकरी करणारी असेल तर ती तुमच्यासोबतच तुमच्या कामालाही चांगल्या प्रकारे समजू शकते आणि तुम्हीसुध्दा तीला समजून घेता. त्यामुळे तुमच्या एकमेकांमध्ये कोणतेही वाद होत नाही.

ऑफिसमध्ये कामाचं प्रेशर घेऊन जेव्हा तुम्ही घरी आलात तर ती तुमची स्थिती समजू शकते. ती घरी उशीरा येण्यावरून किंवा घरातील कामात मदत न करण्यावरून चिडचिड करण्याऐवजी शांत राहील. यात दोघेही एकमेकांच्या गोष्टी समजून घेऊ शकतात. अशात कामाची विभागणी केली तर गोष्टी आणखी सोप्या होतील.

घराची आर्थिक स्थिती टिकून राहते
मेट्रो सिटी असो वा छोटे शहर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे कुटूंबाचा खर्चही वाढला आहे. प्रत्येक जोडीदारांना लग्नानंतर एक चांगलं सुविधाजनक जीवन हवं असतं. सोबतच त्यांना त्यांच्या मुलांसाठीही एक चांगलं भविष्य हवं असतं. अशात परिवारातील केवळ एक व्यक्तीच्या कमाईवर सगळं काही करणं कठीण होतं. त्यामुळेही मुलांना नोकरी करणारी जोडीदार हवी असते. जेणेकरून घर चालवण्यात आर्थिक मदतही होईल.

भविष्याचे नियोजन

जर पती-पत्नी दोघेही ऑफिसला जाणारे असतील तर वर्तमानासोबतच भविष्याच्या दृष्टीनेही बचत करता येते. वाईट वेळ सांगूण येत नाही. त्यामुळे दोघे चांगलं नियोजन करू शकतात. दोघांच्या काम करण्याच्या पध्दतीमुळे ऑफिसवरून उशिरा आल्याने संशयाचे कोणत्याही प्रकारचे हे एक मोठं कारण आहे की, मुलांना नोकरी करणारी मुलगी लग्नासाठी हवी असते.

बाहेरच्या दुनियेची समज
सामान्यपणे नोकरी करणाऱ्या महिला या अधिक ओपन माइंडेड असतात. त्यांना कामाचा दबाव मॅनेज करण्याची समज असते. त्यांना बाहेरील दुनियेचीही समज असते. महिलांना घरी काम असतात असं नाही, पण बाहेर नोकरी करताना काय-काय अडचणी येतात हे त्यांना माहीत असतं. त्यामुळे दोघांचं चांगलं पटतं देखील. जर काही अडचण असेल तर प्रोफेशनल पद्धतीने ती सोडवण्याची त्यांची मानसिकता असते.

स्वत:च्या खर्चाची जबाबदारी
मुलींचं वर्किंग असणं हे मुलासाठी आणि मुलीसाठी दोघांसाठीही चांगलं असतं. लग्नानंतर स्वत:च्या छोट्या छोट्या खर्चांसाठी तिला पतीवर अवलंबून रहावं लागत नाही. पतीलाही त्याच्या खर्चांची चिंता नसते. तेच दुसरीकडे पत्नी नोकरी करणारी असेल तर घरातील खर्चासाठीही तिला पतीवर अवलंबून रहावं लागत नाही. दोघेही ताळमेळ बसवून घरातील खर्च उचलू शकतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News