मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले भाजपला थेट कृतीतून उत्तर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 7 March 2020

शिवसेना हिंदूत्ववादी होती, हिंदूत्ववादी आहे आणि यापुढेही हिंदूत्ववादी राहणार असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करुन दाखवले.

मुंबई: शिवसेना पक्षाने हिंदूत्वाची साथ सोडून धर्मनिरपेक्ष पक्षांना हात दिला आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले.  मात्र, ही सत्ता एक महिना सुद्धा टिकणार नाही असा दावा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केला होता. महाविकास आघाडीच्या ठाकरे सराकारने 100 दिवस व्यवस्थीत कार्यभार चालवून भाजपचा दावा फोल ठरवला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले आणि राम मंदीर बांधन्यासाठी 1 कोटींची मदत जाहीर केली. शिवसेना हिंदूत्ववादी होती, हिंदूत्ववादी आहे आणि यापुढेही हिंदूत्ववादी राहणार असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करुन दाखवले. शिवसेना पक्षांनी   आयोध्येला जावून हिंदूत्वावादी असल्याचे भाजपला चांगलेत कृतीतून उत्तर दिले आहे.  

हिंदूत्ववादी विचारामुळे भाजप आणि शिवसेना एकत्र आली होती. विधानसभा निवडणुकीत नंतर भाजपने शिवसेना पक्षाला मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला त्यामुळे भाजप पासून वेगळे होण्याचा निर्णय शिवसेना पक्षाने घेतला. धर्मनिरपेक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेऊन शिवसेना पक्षानी सत्ता स्थापन केली. मात्र, शिवसेना पक्षाला हिंदूत्वावरुन भाजपने नेहमीच डिवचण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीच सरकार लवकरत कोसळेल असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी सार्वजणीक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले होतो. मात्र महाविकास आघाडी सरकारने 100 दिवस पुर्ण करुन भाजपचे मत खोडून
काढले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत महाविकास आघाडीचे नेते सुनील केदार आयोध्या दर्शनासाठी गेले आहेत त्यामुळे सध्यातरी महाविकास आघाडी सरकार मध्ये समन्वय असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News