जनतेशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शोधला अनोखा मार्ग

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 April 2020

भाषणांना एक कोटी 77 लाखापासून ते 78 लाख जणांनी प्रतिसाद दिला आहे.

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी आणि व्यापक असे प्रयत्न करत आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच जनतेला समाज माध्यमांवरून थेट संबोधित करण्याचे पाऊल उचलले. कोरोनाच्या अनुषंगाने थेट संपर्क टाळून आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून केलेला हा समाज माध्यमाचा वापर प्रभावी आणि उपयुक्त ठरला आहे. 

विशेषतः थेट प्रसारणानंतर टिक-टॉक या सोशल ऍपद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांची भाषणे एक कोटी 77 लाख जणांनी पाहिली आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अन्य भाषणांनाही सरासरी पन्नास लाखांहून अधिक जणांनी प्रतिसाद दिल्याची आकडेवारी आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने #CMOmaharashtra या फेसबुक आणि @CMOMaharashtra या ट्विटर हॅण्डलवरून अनेकदा थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. या भाषणाच्या चित्रफिती यू-टयुबवरही आणि काही मुद्द्यांच्या अनुषंगाने फेसबुक संदेश म्हणूनही प्रसारित करण्यात आल्या आहेत. यात टिक-टॉक या समाज माध्यमावरील चित्रफिती कोट्यवधींपर्यंत पोहचल्याचे दिसते. यातील भाषणांना एक कोटी 77 लाखापासून ते 78 लाख जणांनी प्रतिसाद दिला आहे. या भाषणांनी प्रतिसादाचा सरासरी 50 लाखांहून अधिकचा टप्पा गाठल्याचे आढळते. ठाकरे यांच्या जनतेशी संवादाच्या लिंक या विविध वृत्त वाहिन्यांनीही थेट प्रक्षेपणात समाविष्ट केल्या. त्यामुळे कोरोनाच्या या आव्हानात्मक परिस्थितीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता संयुक्तिक आणि सकारात्मक ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News