खुशखबर! रेशन दुकानांमध्ये मिळणार स्वस्त दरात चिकन, मटण आणि अंडी

यिनबझ टीम
Thursday, 19 December 2019

दिल्ली - देशात गरिबांच्या नावे अनेक योजनांचा आराखडा सादर केला जात असतो, त्यातील काही योजना विचार करण्यासारख्याच असतात, आता अशीच योजना केंद्र सरकारने राबवण्याचा विचार केला आहे. ती म्हणजे गरिबांच्या रेशन कार्डवरून तांदूळ, गहू, साखर, इतर डाळींप्रमाणेच चिकन, मटण आणि अंडीदेखील मिळणार आहेत. 

ज्या आहारात मोठ्याप्रमाणात प्रोटिन असतं आणि ते सामान्य लोकांना परवडलं पाहिजे म्हणून अशा प्रोटिनयुक्त अन्नाचा स्वस्तभाव धान्यामध्ये समावेश करावा असा प्रस्ताव निती आयोगाने केंद्रासमोर मांडला आहे. यामध्ये मांसाहारी म्हणजेच मटण, चिकन आणि अंड्यांचादेखील समावेश आहे. त्याच्यावर विचार विनिमय सुरू आहे, जर  असं झालं, तर भविष्यात रेशन कार्डवर आपल्याला मटण, चिकन आणि अंडीदेखील मिळण्याची शक्यता आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News