चिकन बनी चाओ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 July 2020
  • खवय्यांना नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ बनवावे आणि खावेसे वाटतात. तेव्हा आज मी खास तुमच्याकरीता चिकन बनी चाओ ही रेसिपी घेऊन आली  आहे.
     

खवय्यांना नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ बनवावे आणि खावेसे वाटतात. तेव्हा आज मी खास तुमच्याकरीता चिकन बनी चाओ ही रेसिपी घेऊन आली  आहे.
  
साहित्य :
 
•    ४०० ग्रॅम चिकनचे तुकडे
•    एक चमचा धने पावडर 
•    अर्धा चमचा जीरे पावडर
•    घरचा मसाला आवडीप्रमाणे
•    लाल तिखट आवडीप्रमाणे
•    अर्धा चमचा हळद 
•    पाव चमचा जीरे 
•    पाव चमचा बडीशेप 
•    दीड इंच दालचीनीचा तुकडा
•    चार लवंगा
•    चार पाच भरडलेले मिरे
•    दोन तमालपत्रे
•    दोन बटाटे (ऐच्छीक)
•    दोन लहान कांदे
•    दोन चांगले पिकलेले टोमॅटो
•    दोन चमचे आलं लसुन पेस्ट
•    कोथिंबिर
•    कढीपत्ता
•    दोन हिरव्या मिरच्या बी काढून, तळून
•    मिठ
•    एक चमचा तेल  
•    तुप एक चमचा. (शक्यतो तुप वगळू नये)
•    स्लाईस न केलेला ब्रेड

पाककृती: 

प्रथम एका वाटीत धने-जीरे पावडर, लाल तिखट, चिकन मसाला, हळद हे एकत्र करुन आणि त्यात थोडे पाणी घालून त्याची पेस्ट करुन बाजूला ठेवावी. पॅनमध्ये तुप व तेल टाकून जीऱ्याची व बडीशेपची फोडणी करावी. त्यात लवंग, दालचीनी व तमालपत्र टाकावे. जीरे चांगले फुलून आले की त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंग येई पर्यंत परतुन घ्यावा. कांदा परतल्यावर त्यात आलं लसुन पेस्ट टाकून चांगले परतावे. बियांचा भाग काढून बारीक चिरलेले टोमॅटो परतावे आणि यावर पाच मिनिट झाकण ठेवावे. टोमॅटो शिजुन कांद्याबरोबर मिळून आले की त्यात तळलेल्या मिरच्या टाकून चमच्याने चुरडून घ्याव्यात. तेल सुटू लागले की त्यात सर्व मसाल्यांची केलेली पेस्ट घालावी. तेल सुटेपर्यंत परतावे. मसाला परतुन झाल्यावर त्यात चिकनचे व बटाट्याचे तुकडे टाकावेत व रंग बदलेपर्यंत परतुन घ्यावे. चिकन परतुन झाल्यावर त्यात गरम पाणी घालावे. काही कढीपत्याची पाने हाताने चुरडुन घालावीत. मिरपुड आणि मिठ घालावे व एक चमचा तुप घालून मंद गॅसवर चिकन शिजू द्यावे. चिकन शिजून रस्सा हवा तेवढा घट्ट झाला की गॅस बंद करावा व वरुन गरम मसाला पावडर टाकून, व्यवस्थित हलवून दहा मिनिटांसाठी झाकण ठेवावे.

स्लाईस न केलेला अर्धा ब्रेड लोफ घेवून त्याच्या आतील मऊ भाग काढून जागा करावी. त्यात वरील चिकनचे पिसेस ठेवून वरुन घट्ट मसाला (रस्सा) ओतावा.  आतील निघालेल्या मऊ तुकड्यावरही रस्सा टाकावा. अश्याप्रकारे आपली चिकन बनी चाओची रेसिपी तयार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News