कॉलेजमधील ‘छिछोरे’

यिनबझ ऑनलाईन टीम
Thursday, 31 January 2019

दिग्दर्शक नितेश तिवारी सध्या साजिद नाडियादवालाच्या ‘छिछोरे’ या चित्रपटावर काम करतोय. श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंग राजपूत या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरवरच प्रत्येक पात्राची विचित्र नावे लिहिलेली आहेत.

या नावामागचं रहस्य सांगताना नितेश तिवारी यांनी त्यांच्या कॉलेज लाईफमधील निकनेमवरून ही नावे प्रेरित आहेत असं सांगितलं. ते म्हणतात, ‘मी माझ्या आयुष्याची चार वर्षे हॉस्टेलमध्ये घालवलेली आहेत. आयआयटी बॉम्बेमध्ये शिकताना आम्ही आमच्या कॉलेजमधील मुलांना त्यांच्या टोपण नावानेच हाक मारायचो.

ही टोपण नावं त्यांच्या स्वभावावरून किंवा त्यांच्यातील काही विशिष्ट गोष्टींवरून ठेवली जायची. आम्ही आजही आमच्या बॅचमधील लोकांना त्यांच्या टोपण नावानेच हाक मारतो. जसे की गुप्पा, गुच्ची, प्युक, बी-झीरो, दर्द कुमार, स्किनी, भिंडी वगैरे वगैरे.’ ‘छिछोरे’ चित्रपटात १९९२ मधील कॉलेजमधील लाईफ आणि आत्ताचं लाईफ असे दोन वेगवेगळे काळ दाखवणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News