MPSC परीक्षेसाठी तरुणांनी घातले चक्क छत्रपतींना साकडे

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा-यिनबझ)
Saturday, 29 February 2020

सरकारला सुद्बुद्धी देण्याची महाराजांकडे विनंती

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सर्व परीक्षा घेण्यात याव्यात यासाठी राज्य सरकारला अनेक वेळा विनंती अर्ज करुनही सरकारने दखल घेतली नाही, त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी चक्क रायगडावर जाऊन गुरुवारी (ता.27) छत्रपती शिवाजी महाराजांना साकडे घातले आणि राज्य सरकारला सुद्बुद्धी देण्याची विनंती महाराजांकडे केली.

हे ही वाचा: ऑनलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध; सोशल मी़डियावर करणार अनोखे आंदोलन 

सर्व विभागाच्या ऑनलाईन परीक्षा घेणारे महापोर्टल बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि सर्व विभागांनी स्वतंत्र ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचे अधिकार दिले. त्यामुळे परीक्षेचा निकाल लागण्यासाठी पुर्वीपेक्षा  अधिक वेळ लागेल आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होईल अशी शक्यता विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. संपुर्ण परीक्षा पारदर्शक वातावरणात होण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सर्व परीक्षा ऑफलाईन घेण्यात याव्यात,  अशी मागणी "एमपीएससी स्टुडेंट्स राईट्स्" आणि "एमपीएससी समन्वय समिती"ने सरकारला केली होती.  मात्र, सरकारने कोणतीही दखल घेतली नाही.  त्यामुळे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे किरण निंभोरे, महेश बडे, राहुल कवठेकर, पद्माकर होळंबे, जितेंद्र तोरडमल, विश्वंभर भोपळे, अनुप देशमुख, अंकुश धवणे या तरुणांनी विविध मागण्यांचे साकडे घातले.     

मोठी बातमी: असा एक भारतीय मुस्लीम खेळाडू जो मंदीरात जातो आणि पुजाही करतो -

अनेक वर्षापासून विद्यार्थी अभ्यास करत आहेत,  मात्र सरकारने महाभरतीला स्थगिती दिल्यामुळे बेरोजगारांचे प्रमाण वाढत आहे. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय देखील वाढत असल्याने काही वर्षांनी परीक्षेसाठी असणारी वयाची अट त्यांना लागू होणार नाही. त्यामुळे सरकारने नोकर भरतीला तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी देखील विद्यार्थ्यांनी केली आहे. तरुणांनी आतापर्यंत महापरीक्षा पोर्टल बंद करण्यासाठी जवळपास 70 मोर्चे काढले होते, जर १ मार्च पर्यंत सरकारने परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्याचे ठरवले नाही, तर आम्ही सर्व विद्यार्थी २ तारखेपासून पुणे येथे उपोषणाला बसणार आहोत, असा पावित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

राजं, युवकांच्या भवितव्यासाठी आपणास साकड !

72 हजार पदांची भरती लवकरत केली जावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ऑफलाईन सर्व पदे भरायला सुरुवात करावी, पदवीधारकांचे विविध प्रश्न त्वरीत सोडवावे, रखडलेल्या शिक्षक सेवकांना तात्काळ नियुक्तीचे आदेश द्यावे, असा आदेश राज्य सरकारला द्यावा, यासाठी  तरुणांनी महाराजांना साकडे घातले. 

राज्य शासनाने महापरिक्षा पोर्टल बंद केले आणि विविध विभागाला ऑनलाईन परीक्षा घेण्याचे अधिकार दिले. त्यामुळे पूर्वीपेक्षा जास्त भ्रष्टाचार  होईल. परीक्षा पारदर्शक होण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ऑफलाईन घ्याव्यात.
महेश बडे, सदस्य, एमपीएससी स्टुडेंट्स राईट्स्   

फडणवीस सरकारने सुरु केलेले महापरिक्षा पोर्टल बंद करून एमपीएससी मार्फत परीक्षा घेण्याचे आश्वासन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले होते, परुंतु, त्यांनी आमचा विश्वासघात केला, त्यामुळे आम्हाला कोणीही वाली राहिला नाही, म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे सरकार सत्तेत आले त्यांना सद्बुद्धी देण्याचे साकडे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडे घातले.
- राहुल कवठेकर, सदस्य, एमपीएससी समन्वय समिती

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News