#CSMT दी अनटोल्ड स्टोरी ऑफ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
- काही वर्षांपूर्वी याचे नावं व्हिक्टोरिया टर्मिनस हे होते.
- एकोणिसाव्या शतकातील शेवटच्या तीन वर्षांमध्ये मुंबईच्या वैभवात निरनिराळ्या नयनरम्य इमारतींची भर पडली.
काही वर्षांपूर्वी याचे नावं व्हिक्टोरिया टर्मिनस हे होते. एकोणिसाव्या शतकातील शेवटच्या तीन वर्षांमध्ये मुंबईच्या वैभवात निरनिराळ्या नयनरम्य इमारतींची भर पडली.
बोरीबंदर हे त्यातील सर्वोत्कृष्ट वास्तुशिल्प.ह्या इमारतीच्या कौशल्यपूर्ण आणि यथोचित अशा रचनेमुळे त्याचप्रमाणे नक्षीदार सुंदर कमानींमुळे ही इमारत एखाद्या भव्योदात्त चर्च सारखी दिसते.मध्यभागी मोठा घुमत आणि वर निमुळते होत जाणारे मनोरे ह्यामुळे लंडनच्या वेस्ट मिनिस्टर एबे ह्या इमारतीशी तिचे साधर्म्य जोडले गेले आहे.
संपूर्ण कोरीव दगडांच्या ह्या इमारतीवर प्लास्टरचे नक्षीकाम, नक्षीदार गडद रंगाच्या काचा असलेल्या इमारतीच्या खिडक्या आणि घुमट व मनोरे ह्यांवरील खिडक्या या संपूर्ण वास्तूला उठावदार बनवतात.