हे मुंबईचं त्या काळाचं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, जे आजही तसंच उभं आहे...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 26 May 2019

मुंबईतील सर्वात जुने आणि जवळपास ५० हजाराहून अधिक कलाकृतींचा संचय आणि अमर्याद माहितीचा खजिना म्हणजे मुंबईचे पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आणि आताचे श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय.

मुंबईतील सर्वात जुने आणि जवळपास ५० हजाराहून अधिक कलाकृतींचा संचय आणि अमर्याद माहितीचा खजिना म्हणजे मुंबईचे पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आणि आताचे श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय.

ब्रिटीश वास्तुविशारद डब्लू.जी.विटेट यांनी यांचा आराखडा तयार करून याची उभारणी केली असून स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे इ.स १९२२ मध्ये सर्वांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. संग्रहालयात भारत, चीन, जपान आणि अन्य देशांच्या कलाकृती येथे पहावयास मिळतील.

याव्यतिरिक्त नौकावाहन, मराठा मुघल सरदरांच्या वापरातील शस्त्रे, अनेक शिल्पकला, अन्य मुर्त्या या विशेष दालनात पाहण्यास मिळतील. इथले विविध दालन व वस्तू पाहताना दिवसही अपुरा पडतोय कि काय असे नक्कीच तुम्हाला वाटेल.

समस्त विश्वाच्या कलाकृती व इतर साहित्य व अन्य कृतींची माहिती करून घेण्यासठी नक्की या वास्तुसंग्रहालयास भेट द्या.

वेळ:- मंगळवार ते रविवार सकळी १०.१५ ते सायं ५.४५ वाजेपर्यंत.
शुल्क:- प्रवेश शुल्क-५ रु, प्रौढांसाठी- ३० रु

वस्तूसंग्रहालयात जाण्यासाठी- छत्रपती शिवाजी टर्मिनस वरून बस क्र. १४, ६९, १०१, १३०
चर्चगेट स्थानकावरून बस क्र. ७०, १०६, १२२, १२३, १३२

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News