चांदमियां पाटल्यांच्या छातीची तातडीने तपासणी करावी - शिवसेना

यिनबझ टीम
Monday, 9 March 2020

आजच्या सामनाच्या आग्रलेखात चंद्रकांत पाटील यांचा चांदमियां असा उल्लेख करत त्यांच्यावर टिका केली आहे.

मुंबई - गेल्या 7 मार्च रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अयोध्येला भेट दिली होती, त्यानिमित्ताने भाजपच्या काही नेत्यांनी शिवसेनेचे कौतुक केले होते, तर काही नेत्यांनी त्यांच्यावर टिकाही केली होती. शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्यावरही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टिका केली होती, त्यामुळे आजच्या  सामन्यातून चंद्रकांत पाटील यांची चांगलीच हजेरी घेतल्याचे दिसून येत आहे.

आजच्या सामनाच्या आग्रलेखात चंद्रकांत पाटील यांचा चांदमियां असा उल्लेख करत त्यांच्यावर टिका केली आहे. काही दिवसांपुर्वी  चंद्रकांत पाटील यांनी हिंदुत्वाचा पुरावा देत "माझी छाती फाडली तर राम दिसतील" असे वक्तव्य केले होते, त्याला उत्तर देत, 'चांदमियां यांनी छाती फाडण्याची गरज नाही, त्यांच्या छातीत असलेले हिंदुत्वाचे काळेकुट्ट विष अवघ्या महाराष्ट्राने 100 दिवसांपुर्वीच पाहिलं आहे. राम समजून घेण्यासाठी माणसाकडे सत्यवचन आणि माणुसकीची गरज आहे, मात्र ठाकरे सरकारच्या विरोधकांकडे त्याचीच कमी आहे, तुमच्या छातीत खरच राम असेल  तर छाती बडवणे बंद करा नाहीतर छातीत असेलल्या रामाला त्रास होईल, अशा खरमरीत शब्दात सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटलांवर टिका केली आहे.

उध्दव ठाकरे भाजपसोबत असतानाही अयोध्येला गेले होते, त्यावेळेस अख्या महाराष्ट्रातील हुंदुत्व जपणारा जनसमुदायदेखील त्यांच्या सोबत होता, यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी अयोध्येतल्या रामलल्लाचे दर्शन घेतले, सोबतच मंदीरासाठी मोठी देणगी देऊ केली, तिथे महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा केली, हे सगळं असताना महाराष्ट्रातल्या अनेक विरोधकांच्या पोटात कळा सुरू झाल्या आहेत. प्रदेश भाजपाचे अध्यक्ष चांदमियां पाटील यांच्या छातीची तातडीने तपासणी करण्यात यावी, ते म्हणाले होते, 'माझी छाती फाडली तर त्यात राम दिसतील,' चांदमियांनी त्यांची छाती फाडण्याची गरज नाही, त्यांच्या छातीत हिंदुत्वाच्या बाबतीत किती काळेकुट्ट विष ठासून भरले आहे, याचा अनुभव शंभर दिवसांपुर्वी अख्ख्या महाराष्ट्राने घेतल्या असल्याचे सामनामध्ये म्हटले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News