केमिकल मारलेले मासे तुम्ही खाताय?

यिनबझ ऑनलाईन टीम
Tuesday, 26 February 2019

तुम्ही मासे खात असाल तर ही बातमी बघा. तुम्ही खात असलेल्या माशांना केमिकलयुक्त रंग लावलेला नाही ना याची खात्री करा...कारण, केमिकलयुक्त रंग माशांना मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय...त्यामुळं याची सत्यता जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला...मग काय सत्य समोर आलं पाहा.. 

बोंबीलला कृत्रिम रंगाचा वापर करून लोकांच्या जिवाशी खेळत आहेत आणि पैसा कमावत आहेत. मध्यम वर्गातील आपण आहोत स्वस्त म्हणून आपण बोंबील घेतो पण ते बोंबील नसून विष घेतो.

हा मेसेज आणि व्हिडीओही व्हायरल होतोय. त्यामुळं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...केमिकलयुक्त रंग मारत असतील तर मासे खाणं आरोग्यास घातक ठरू शकतं.

हा व्हिडिओ कुठला आहे याची सध्या चौकशी केली जातेय. मासे ताजे दिसावेत म्हणून केमिकलचा वापर केला जातो. असे मासे खाल्ल्यानं गंभीर आजारही होऊ शकतात. त्यामुळं मासे विकत घेताना त्यांना रंग मारलेला नाही ना याची खात्री करा.

- राजेंद्र जाधव, सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय विभाग

पडताळणीतील सत्य 

  • मुंबईतील किनारपट्ट्यांवर असा प्रकार सहसा होत नाही
  • केरळ,तामिळनाडू,आंध्र मधील काही मासे अश्या पद्धतीने रंग देऊन विक्रीसाठी आणतात
  • मासे ताजे दिसावेत म्हणून गुलाल किंवा केमिकलचा वापर केला जातो
  • केमिकल मारलेले मासे खाल्ल्यास आजार होऊ शकतात

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News