चांगल्या झोपेसाठी 'हे' उपाय नक्की करून पहा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

बदलत्या जीवनशैलीत आपली झोप हळहळू कमी होत चालली आहे. रोज किमान आठ तास झोप ही शरीरास आवश्यक आहे. झोपेमुळे थकवा, मरगळ निघून जाते. सततचा ताण, वेळेची कमतरता, नकारात्मक विचार, बदलती जीवनशैली या सर्वामुळे झोपेवर खूपच नकारात्मक परिणाम होत आहे. अनेकांना नीट झोप येत नाही, तेव्हा चांगल्या झोपेसाठी  खालील  उपाय नक्की करून पहा.

- झोपण्याआधी कॉफी पिणे कधीही टाळा.  कॉफीमुळे झोप निघून जाते. त्यामुळे झोपण्यापूर्वी कॉफी पिण्याची सवय असेन तर ती वेळत बदला.

- झोपण्यापूर्वी शक्यतो मोबाइल दूरच ठेवा. घरातील मोठे दिवे मालवून शक्यतो  कमी प्रकाश असलेल्या लाइट्स सुरू ठेवा.

 - जेवल्यानंतर  आणि झोपण्यापूर्वीच्या मधल्या काळात खाणं शक्यतो टाळा. पोट भरलेलं असल्यावर पुन्हा खाल्ल्यानं पोट जड होतं आणि  त्यामुळे नीट झोपंही येत नाही.

- झोपेची एक ठराविक वेळ ठरवा. या वेळेत मला झोपलंच पाहिजे  हे स्वत:ला बजावून ठेवा. झोपेच्या वेळा सतत बदलत राहिल्या की याचा त्रास तुम्हाला सर्वाधिक होतो.

-  म्युझिक थेरपी हा देखील उत्तम पर्याय आहे. झोपण्यापूर्वी आवडती गाणी ऐकल्यानं झोप पटकन येते. अनेक म्युझिक अॅपमध्ये खास नाइट साँगचं कलेक्शनही उपलब्ध आहेत. ही गाणी अत्यंत मंद आणि मन शांत करणारी असतात.

 - याव्यतिरिक्त जायफळ घातलेलं दूध प्यायल्यानंही शांत झोप लागते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News