या संकेतस्थळावर पाहा; उद्या सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 July 2020

१ विद्यार्थी आणि पालक उद्या लागणार निकाल डिजीलॉकर मोबाइल अॅप द्वारेसुध्दा पाहू शकतात. 
२ एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येईल 
३ अधिक माहिती बोर्ड संकेतस्थळाद्वारे जाहीर करेल

या संकेतस्थळावर पाहा; उद्या सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल

सीबीएसई बोर्डाने अचानक सोमवारी दुपारी बारावीचा निकाल जाहीर करून पालकांना आणि विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला. परंतु उद्या सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल cbseresults.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. 

सोमवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यापूर्वी सीबीएसई बोर्डाकडून कोणतीही अधिकृत सूचना जाहीर करण्यात आली नव्हती. दुपारी एक वाजता निकाल जाहीर झाल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांना कळवले. त्यामुळे दहावीचा निकालाच्या प्रतिक्षेत विद्यार्थी आणि पालक दोघेही होते. शिवाय निकालांच्या तारखांविषयी सोशल मीडिया प्रचंड गोंधळ घालणारे मेसेज फिरत होते. पण होणा-या सर्व चर्चांना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी पु्र्णविराम दिला आहे. 

१ विद्यार्थी आणि पालक उद्या लागणार निकाल डिजीलॉकर मोबाइल अॅप द्वारेसुध्दा पाहू शकतात. 
२ एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येईल 
३ अधिक माहिती बोर्ड संकेतस्थळाद्वारे जाहीर करेल

कोरोनामुळे दहावीचे राहिलेले १ जुलै ते १५ जुलै दरम्यान होणार होते, पण कोरोनाची परिस्थिती पाहून पालकांनी सर्वोच्छ न्यायालयात धाव घेतली आणि परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. बोर्डाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेत या परीक्षा रद्द केल्या आणि विद्यार्थ्यांना काही ठराविक सूत्रानुसार गुण देण्याचा निर्णय घेतला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News