अभिनेता अंश अरोराची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 19 May 2020
  • सलमान खान प्रॉडक्‍शन हाऊसच्या नावाने बनावट इमेल

मुंबई : अभिनेता अंश अरोरा याला ई-मेल व दूरध्वनीवरून "टायगर जिंदा है-3' चित्रपटात प्रमुख खलनायकाच्या भूमिकेची ऑफर सलमान खान प्रॉडक्‍शन हाऊसच्या नावाने देण्यात आली होती. हा प्रकार बनावट असल्याचे उघड झाल्यावर सलमान खानने ट्विट करून अशा कोणत्याही चित्रपटासाठी कास्टिंग सुरू नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर अंशने ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.

"क्वीन्स है हम' व "तनहाईयॉं' अशा मालिकांमुळे प्रसिद्ध झालेल्या अंश अरोरा याच्याशी सलमान खान प्रॉडक्‍शन हाऊसच्या नावाने एका महिलेने संपर्क साधला. श्रृती असे नाव सांगणाऱ्या या महिलेने ई-मेल व दूरध्वनीद्वारे "टायगर जिंदा है-3' या चित्रपटातील प्रमुख खलनायकाच्या भूमिकेसाठी अंशची निवड झाल्याचे सांगितले. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभू देवा 3 मार्चला अंशची ऑडिशन घेणार असल्याचा ई-मेलही अंशला आला होता; परंतु काही कामांत ते व्यग्र असल्यामुळे ही ऑडिशन रद्द करण्यात आली.

दरम्यान, चार दिवसांपूर्वीच सलमान खानने ट्विटरवर एक निवेदन जारी करून आपली प्रॉडक्‍शन कंपनी कोणत्याही प्रकारचे कास्टिंग सध्या करत नसल्याचे स्पष्ट केले. नवीन कास्टिंग करण्यासाठी आम्ही कोणत्याही एजंटला सांगितलेले नाही. अशा प्रकारचे ई-मेल अथवा दूरध्वनी आल्यास विश्‍वास ठेवू नका, असे आवाहनही त्याने केले. अफवा पसरवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सलमानने स्पष्ट केले. त्यानंतर अंशला आपली फसवणूक झाल्याचे समजले. या प्रकरणी त्याने ओशिवरा पोलिसांकडे तक्रार केली आहे.

शॉर्ट लिस्ट केले आहे!

व्हिडीओ व छायाचित्रे पाहून तुला खलनायकाच्या भूमिकेसाठी शॉर्ट लिस्ट करण्यात आले आहे. याबाबतची बैठक काही दिवसांनंतर होईल, असेही अंश अरोरा याला सांगण्यात आले. या चित्रपटासाठी त्याचे प्रशिक्षण पुढील महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याचेही कळवण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News