कुर्तीवर चंदेरी दुपट्टा! खास शोभतोय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019
  • दुपट्ट्यामुळे साध्या कुर्तीलाही रिच लुक येतो. अनारकली, अंब्रेला, स्ट्रेट कट कुर्तीवर चंदेरी दुपट्टा खुलून दिसतो
  • आडव्या स्ट्रीपच्या डिझाईनची चंदेरी दुपट्टा स्लीक व कॉटन स्लीक मिक्‍स मटेरियलमध्ये बाजारात उपलब्ध असतात.

‘जिं  दगी प्यार का गीत है...’ म्हणणारी पद्मिनी कोल्हापुरे असो, ‘सिलसिला’मधील रेखा असो वा ‘चाँदनी’मधील श्रीदेवी, या सर्वच अभिनेत्रींनी आपल्या पेहरावात चंदेरी सिल्कच्या दुपट्ट्याचा वापर केला. त्या वेळच्या चित्रपटांत अभिनेत्री प्लेन पंजाबी ड्रेसवर चंदेरी दुपट्ट्यांचा हमखास वापर करताना दिसत. हीच चंदेरी दुपट्ट्यांची फॅशन पुन्हा एकदा आली आहे.

लग्न असो वा पारंपरिक सण-सोहळे तरुणी कुर्तीवर चंदेरी दुपट्टा फॉलो करत आहेत. या दुपट्ट्यामुळे साध्या कुर्तीलाही रिच लुक येतो. अनारकली, अंब्रेला, स्ट्रेट कट कुर्तीवर चंदेरी दुपट्टा खुलून दिसतो. प्लेन कुर्तीवर कॉन्ट्रॉस रंगाची चंदेरी दुपट्टा जास्त उठून दिसतो. उभ्या आडव्या स्ट्रीपच्या डिझाईनची चंदेरी दुपट्टा स्लीक व कॉटन स्लीक मिक्‍स मटेरियलमध्ये बाजारात उपलब्ध असतात. स्लीकचा दुपट्टा हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत; तर कॉटन स्लीक मिक्‍स ५०० ते ८०० रुपयांपर्यंत मिळतो. सफेद, मोती, ग्रे, आकाशी, पित या रंगांच्या चंदेरी दुपट्ट्याला तरुणींची सर्वाधिक पसंती आहे.

पैठणीमध्ये सगळ्यांना रस असतो. आजच्या तरुणींना साडी नेसणे जमतेच असे नाही, म्हणून आज पैठणीच्या मटेरियलमध्ये ड्रेस आणि कुर्ती बाजारात उपलब्ध झालेत. साडीच्या पदराएवढाच भरजरी पैठणी दुपट्टा समारंभात वापरला तर पारंपरिक लूक येतो. त्यामुळे तरुणी आणि महिलाही या दुपट्ट्याला जास्त पसंती देत आहेत. कॉटन सिल्क मटेरिअल, दोन्ही बाजूला पैठणी बॉर्डर, पदराप्रमाणे किनाऱ्यावर गोंडे असे स्वरूप पैठणीच्या दुपट्ट्याचे आहे. प्युअर सिल्क आणि आर्ट सिल्कमध्ये दुपट्टाही उपलब्ध आहेत. ऑनलाईनवरही हा दुपट्टा उपलब्ध आहे. कॉटन किंवा कॉटन सिल्कच्या अंब्रेला किंवा अनारकली कुर्ता किंवा ड्रेसवर पैठणीचा दुपट्टा खुलून दिसतो. प्लेन रंगातील बुट्टीदार कुर्ती यावर गडद किंवा कॉनट्रस रंगाचा पैठणीचा दुपट्टा उठावदास दिसतो. गडद हिरवा, मजंठा, जांभळा, गुलाबी, लाल, आकाशी या रंगाच्या पैठणी दुपट्ट्याला तरुणांची सर्वाधिक पसंती मिळत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News