ही वाहिनी २४ तास इयत्तानिहाय शिक्षण देणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 6 July 2020

असे होतील तास 

तीन वाहिन्यांवर दररोज सहा तासिका होतील 
इतर वेळेत झालेले तास पुन्हा-पुन्हा दाखवले जातील
होणा-या तासिकांचे वेळापत्रक लवकरच मिळेल
इतर नऊ वाहिन्या सुध्दा याच पध्दतीने शिक्षण देतील 

महाराष्ट्र - कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रत्यक्ष शाळा कधी सुरू होतील, हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे यंदाचं शैक्षणिक वर्ष वाया जातंय की काय ? अशी भीती पालकांना वाटतं आहे. यंदाचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जिओ टिव्हीवर तीन शैक्षणिक वाहिन्यांचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. तसेच इतर शैक्षणिक वाहिन्या सुध्दा लवकरच सुरू होतील असेही गायकवाड सांगितले आहे. 

सध्या टिव्हीच्या माध्यमातून जास्तीत शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहचेल याचा विचार सरकार करत आहे. याचाच एक भाग म्हणून दहावी मराठी आणि इंग्रजी माध्यम आणि बारावीच्या सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी तीन वाहिन्या आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत. या ऑनलाईन शिक्षणाचा विद्यार्थांना अधिक फायदा होईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके देण्यात काम सुरू अंतिम टप्प्यात सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. विद्यार्थ्यांना स्वत: अभ्यास करताना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या शैक्षणिक दिनदर्शिकेचा फायदा होईल. 

असे होतील तास 

तीन वाहिन्यांवर दररोज सहा तासिका होतील 
इतर वेळेत झालेले तास पुन्हा-पुन्हा दाखवले जातील
होणा-या तासिकांचे वेळापत्रक लवकरच मिळेल
इतर नऊ वाहिन्या सुध्दा याच पध्दतीने शिक्षण देतील 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News