रोहितला गोलंदाजी करणे आव्हानात्मक : फर्ग्युसन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 July 2020
  • भारतीय सलामीवीर रोहित शर्माला गोलंदाजी करणे खूप आव्हानात्मक आहे. कारण त्याच्याकडे लाईन आणि लेंथ ओळखण्याची उत्कृष्ट क्षमता आहे, असे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने सांगितले.
  • कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करणे सर्वात अवघड आहे, असे विचारले असता फर्ग्युसन म्हणाला, रोहित शर्मा मला खूप आव्हानात्मक वाटतो.

नवी दिल्ली :- भारतीय सलामीवीर रोहित शर्माला गोलंदाजी करणे खूप आव्हानात्मक आहे. कारण त्याच्याकडे लाईन आणि लेंथ ओळखण्याची उत्कृष्ट क्षमता आहे, असे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने सांगितले. कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करणे सर्वात अवघड आहे, असे विचारले असता फर्ग्युसन म्हणाला, रोहित शर्मा मला खूप आव्हानात्मक वाटतो. त्याला लवकरच बाद नाही केले, तर तो मोठी धावसंख्या उभारतो. तो जागतिक दर्जाचा फलंदाज आहे.

मी रोहितचा मोठा चाहता आहे. मला वाटते की, तो अपवादात्मक फलंदाज आहे. त्याचबरोबर भारतीय कर्णधार विराट कोहली, ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हेसुद्धा उत्तम प्रकारचे फलंदाज आहेत, असे फर्ग्युसन म्हणाला. शिवाय यांच्याविरुद्ध गोलंदाजी करणे नेहमीच अवघड असते, त्याला बाद केले की मधल्या फळीच्या फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करताना दडपण राहत नाही, असेही त्याने सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News