पुण्याच्या चैतन्य होलगरेने पटकावले सुवर्ण पदक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

महिलांच्या दहा हजार मीटर शर्यतीत पुणे विद्यापीठाची आणखी एक नाशिककर पूनम सोनुनेची चौथ्या स्थानावर घसरण झाली.

नागपूर : भुवनेश्‍वर येथे सुरू असलेल्या पहिल्या विद्यापीठ खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चैतन्य होलगरेने पुरुषांच्या पंधराशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या शर्यतीत दुर्गा देवरेला रौप्यपदक मिळाले.

नागपूरचा असलेला आणि नाशिक येथे विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या चैतन्यने पंधराशे मीटरची शर्यत ३ मिनिटे ५२.५४ सेकंदांत पूर्ण केली. महिलांच्या शर्यतीत पंजाबी विद्यापीठ पतियाळाच्या हरमिलन बैन्सने ४ मिनिटे १४.६८ सेकंदांत बाजी मारली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाशिकच्या दुर्गा देवरेने ४ मिनिटे २४.२६ सेकंदांत शर्यत पूर्ण करीत रौप्य जिंकले. पुरुषांच्या ११० मीटर हर्डल्स शर्यतीत मुंबई विद्यापीठाच्या अल्डेन नोरोन्हाला रौप्यपदक मिळाले. त्याने १४.६४ सेकंद वेळ दिली.

महिलांच्या दहा हजार मीटर शर्यतीत पुणे विद्यापीठाची आणखी एक नाशिककर पूनम सोनुनेची चौथ्या स्थानावर घसरण झाली. महिलांच्या गोळाफेकीत मुंबई विद्यापीठाच्या पूर्णा रावराणेने १३.६० मीटर अंतरावर गोळा फेकला. मात्र, तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News