सीईटीची परीक्षा 'या' महिन्यात होणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 3 September 2020

सीईटीची परीक्षा 'या' महिन्यात होणार

सीईटीची परीक्षा 'या' महिन्यात होणार

कोरोनाच्या काळात अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर गरजेच्या असलेल्या परीक्षा परिस्थिती पाहून घेण्यात येतील असं राज्य सरकारने स्पष्ट केलं होतं. त्याचअनुशंगाने एमएचटी सीईटी २०२० च्या १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येतील असं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत सांगितले.

येत्या काही दिवसात अंतिम तारखांबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल. तसेच ऑक्टोबर पहिल्या आठवड्यात कोरोनाची परिस्थिती राज्य सरकार अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी'च्या परीक्षा घेण्याची शक्यताआहे, असेही उदय सामंत म्हणाले.

कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात देशात असल्याने अनेक राज्यांनी परीक्षा पुढे ढकलावी अशी विनंती विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केली होती. पण आता परीक्षांना अधिक उशीर होत असल्यामुळे राज्य सरकारने एमएचटी सीईटी २०२० च्या परीक्षा १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येतील असं स्पष्ट केलं आहे.

परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी पालक आणि विद्यार्थी यांनी सोशल मीडियावरती मागणी केली होती. तसेच राज्य सरकारची सुध्दा तीच भूमिका होती. त्यामुळे कोरोनाच्या काळात परीक्षा घेणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे, अशी सहा राज्यांची भूमिका होती. राज्य सरकारकडून केंद्र सरकारला परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती सुध्दा केली होती. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या परीक्षांचा गोंधळ लवकरचं संपेल, कारण १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News