यंदा ‘सीईटी’च्या परीक्षेत होणार बदल 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 December 2019
  • अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी- सीईटी परीक्षा घेण्यात येतात.
  • राज्यातील काही वैद्यकीय अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यासाठी पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) या गटातून आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) या गटातून परीक्षा घेण्यात येतात.

मुंबई : अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) आणि अभियांत्रिकीसाठी पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) अशा दोन परीक्षा २०२० मध्ये घेण्यावर प्रवेश नियामक प्राधिकरणाने (एआरए) शिक्कामोर्तब केले आहे.

‘सीईटी’साठी पीसीएमबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र) या विषयांची एकच सीईटी परीक्षा घेण्यात येत असे; पंरतु एप्रिलमध्ये होणाऱ्या ‘सीईटी’त हा गट रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी- सीईटी परीक्षा घेण्यात येतात. राज्यातील काही वैद्यकीय अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यासाठी पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) या गटातून आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) या गटातून परीक्षा घेण्यात येतात. त्याचबरोबर गेल्या वर्षीपर्यंत दोन्ही अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्यांची पीसीएमबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र) या विषयांची एकच परीक्षा घेतली जात होती.

वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘पीसीबी’ आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘पीसीएम’ अशा वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतील. दोन्ही अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना दोन्ही गटांच्या परीक्षा द्याव्या लागतील, त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्षेत्र सुरुवातीलाच निश्‍चीत करावे, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News