आत्ता सीईटीच्या गुणइतकेचं बारावीच्या मार्कांना महत्व!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 February 2020

विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्यासाठी सीईटीमधील गुणांबरोबरच बारावीच्या गुणांचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत.

मुंबई: विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टर्निग पॉंइट म्हणजे बारावी परीक्षा असते. बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता मिळवुनही विद्यार्थ्यांना सीइटी परिक्षेसाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. सीइटी परीक्षेमध्ये गुणवत्ता मिळविलेल्या विदयार्थ्यांना चांगल्या शाखेत प्रवेश मिळतो. त्यामुळे सीइटी परिक्षेचे महत्त्व वाढत आहे आणि बारावीच्या गुणाचे महत्त्व कमी होत चालले आहे. 

विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्यासाठी सीईटीमधील गुणांबरोबरच बारावीच्या गुणांचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये सीईटी परीक्षेचे गुण व बारावीचे गुण एकत्रित करून निकाल लावण्यासंदर्भात किंवा अन्य मार्गाचा अवलंब करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाची पडताळणी सुरू असे मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

दोन विद्यार्थ्यांचे सीईटीमधील गुण समान असल्यास बारावीतील गुण आणि फिजिक्‍स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा बायोलॉजी या विषयांतील गुण पाहिले जातात. ज्याचे गुण अधिक असतील, अशा विद्यार्थ्याला प्रवेशात प्राधान्य दिले जाते. या नियमांमुळे सीईटीला अवास्तव महत्त्व आले आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी बसतो, असे सामंत म्हणाले. 

बारावीची परीक्षा देणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माण आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे असतो. अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटीमधील गुणांना महत्त्व देण्यात येते. त्यामुळे बारावीत अधिक गुण मिळवण्याकडील विद्यार्थ्यांचा कल कमी होऊ लागला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News